Mahabreaking

[breaking_news]

MLA Manoj Kayande : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विकासकामात योगदान द्यावे – आमदार मनोज कायंदे

MLA Manoj Kayande : सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विकासकामात फार मोठे योगदान असून त्यांनी परिसरातील समस्या मांडाव्यात. त्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. देऊळगाव राजा येथे प्रशस्त पेन्शन भवन उभारण्यासाठी शासनाकडून १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार मनोज कायंदे यांनी दिले. तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित पेन्शन डे कार्यक्रमात ते बोलत होते.

MLA Manoj Kayande
पेन्शन भवनासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन

देऊळगाव राजा : सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विकासकामात फार मोठे योगदान असून त्यांनी परिसरातील समस्या मांडाव्यात. त्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. देऊळगाव राजा येथे प्रशस्त पेन्शन भवन उभारण्यासाठी शासनाकडून १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार मनोज कायंदे यांनी दिले. तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित पेन्शन डे कार्यक्रमात ते बोलत होते.

विरंगुळा भवन येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे मानद संचालक गोविंदराव अहिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मनोज कायंदे, तर बुलढाणा जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. मधुकरराव परहाड उपस्थित होते. अन्य मान्यवरांमध्ये चंद्रशेखर सदावर्ते, तेजराव साबळे, प्रा. रामदास शिंगणे, कुऱ्हाले, विनायक खराटे, रावसाहेब पुजारी, बळीराम मापारी, काशिनाथ खांडेभराड, धनशिराम शिपणे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अंकुश रोडे, डॉ. अशोक काबरा आदींचा समावेश होता.

याप्रसंगी डॉ. मधुकर परहाड, धनशिराम शिपणे, रावसाहेब पुजारी, गोविंदराव अहिरे, प्रकाश खांडेभराड, विजय रायमल, श्रीधर जगताप, प्रा. विनायक कुळकर्णी यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास मधुकर धुळे, रमेश गवई, पंडितराव पाथरकर, कैलास शेळके, आशाताई शेळके, राम चौधरी, अरुण सपाटे, प्रा. प्रदीप मिनासे, प्रा. अशोक डोईफोडे, सर्जेराव वाघ, गजानन ढवळे, रंगनाथ सपाटे, सुशील हनुमंते, गोपाळराव बोरुळ, संजय वासलेकर, अ. ना. लताड, पूर्णचंद्र जोशी, राजेंद्र गोरे, दत्ता कोरडे, मधुकर शेळके, नंदकिशोर बाहेती, रामदास कुलथे, मार्तंड आप्पा घिके, दशरथ नरोडे, मांटे सर, मेहमूद बेग, मुन्ना ठाकूर तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रमेश नरोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव गोविंदराव बोरकर यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top