Mahabreaking

🔴 BREAKING
18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Dr. Shatrughan Jadhav :बी. एस. पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव रुजू Saral portal :सरल पोर्टलवर माजी विद्यार्थी संघांच्या उपक्रमांची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक Competition with private schools :खाजगी शाळांना टक्कर; जिल्हा परिषद शाळेत संगणकीय शिक्षणाला प्राधान्य The cultural program :‘किलबिल पाखरांची’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न Salgadi : सालगड्यासाठी गावोगावी ‘शोधा-शोध’; पॅकेज सव्वालाखांवर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Dr. Shatrughan Jadhav :बी. एस. पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव रुजू Saral portal :सरल पोर्टलवर माजी विद्यार्थी संघांच्या उपक्रमांची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक Competition with private schools :खाजगी शाळांना टक्कर; जिल्हा परिषद शाळेत संगणकीय शिक्षणाला प्राधान्य The cultural program :‘किलबिल पाखरांची’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न Salgadi : सालगड्यासाठी गावोगावी ‘शोधा-शोध’; पॅकेज सव्वालाखांवर

Encroachments :अंजनी बु. रस्त्यावर अतिक्रमण वाढले; वाहनधारक त्रस्त

Encroachments : मेहकर–घाटबोरी रस्त्यावर असलेल्या अंजनी बु. ग्रामपंचायत परिसरात सध्या रस्त्यालगत अतिक्रमण वाढल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अतिक्रमणामुळे अनेक वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

Encroachments

डोणगाव : मेहकर–घाटबोरी रस्त्यावर असलेल्या अंजनी बु. ग्रामपंचायत परिसरात सध्या रस्त्यालगत अतिक्रमण वाढल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अतिक्रमणामुळे अनेक वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

मेहकर येथून अंजनी बु. मार्गे घाटबोरीकडे जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता असून, अंजनी बु. फाट्यापासून गावापर्यंत नव्याने सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे हा रस्ता पुन्हा जैसे थे अवस्थेत गेला आहे.

या मार्गावरून घाटबोरी व लोणीगवळी येथे जाण्यासाठी दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. परंतु ग्रामपंचायत परिसरात रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने नागरिक आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. परिणामी अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top