Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

De. Raja Municipal Election : दे. राजा पालिका निवडणूक : अर्थकारणावर लगाम लावण्यात निवडणूक यंत्रणा अपयशी?

De. Raja Municipal Election : देऊळगाव राजा नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता येत्या शनिवार, दि. २० रोजी नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागांतील २१ नगरसेवक पदांसाठी मतदान होणार असून, शहरातील एकूण २९ हजार ३२६ मतदार २२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणा जरी सक्रिय असली तरी मतदारांमध्ये अपेक्षित उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

De. Raja Municipal Election
२९ हजार मतदार ठरवणार २२ उमेदवारांचे भवितव्य; प्रचार सुरू, पण उत्साह ओसरलेला

गजानन तिडके

देऊळगाव राजा  : देऊळगाव राजा नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता येत्या शनिवार, दि. २० रोजी नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागांतील २१ नगरसेवक पदांसाठी मतदान होणार असून, शहरातील एकूण २९ हजार ३२६ मतदार २२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणा जरी सक्रिय असली तरी मतदारांमध्ये अपेक्षित उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे.

न्यायालयाच्या आदेशामुळे ऐनवेळी निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांची आखलेली रणनिती विस्कळीत झाली. वाढलेल्या कालावधीत प्रचारासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागत असल्याने उमेदवारांचे गृहीत धरलेले अर्थकारण दुपटीने वाढले असून, अनेकांची गोची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

देऊळगाव राजा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार, तर दहा प्रभागांतील २१ जागांसाठी तब्बल ७७ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. वेळेवर पक्षांतर केलेल्या उमेदवारांना नव्या पक्षाची भूमिका अंगवळणी न पडल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे.

नगराध्यक्ष पदासाठी आघाड्या जरी जाहीर झाल्या असल्या, तरी प्रभाग पातळीवरील उमेदवार आपापला स्वतंत्र प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांना प्रत्येक प्रभागात जाऊन पुन्हा मनधरणी करावी लागत असून, समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे.

प्रभाग रचना नवी; आकडे जुळवताना उमेदवारांची दमछाक
देऊळगाव राजा शहरात नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमुळे उमेदवारांना मतदारसंख्या व बूथ व्यवस्थापन जुळवताना अडचणी येत आहेत. शहरातील दहा प्रभागांमध्ये एकूण ३० मतदान केंद्रे असून, पुरुष मतदारांची संख्या १४,८५४ तर महिला मतदारांची संख्या १४,४०६ आहे. एकूण मतदारसंख्या २९,३२६ असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

आजी–माजी लोकप्रतिनिधींसाठी प्रतिष्ठेची लढत
ही नगरपालिका निवडणूक सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची नांदी मानली जात आहे. त्यामुळे आमदार मनोज कायंदे, माजी आमदार राजेंद्र शिंगणे तसेच माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही लढत राजकीय दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

अर्थकारण व प्रलोभने; लोकशाहीसाठी धोक्याची घंटा
या निवडणुकीत कधी नव्हे एवढे अर्थकारण आणि विविध प्रलोभने खुलेआम फिरत असल्याच्या चर्चा आहेत. प्रभागनिहाय नेत्यांना पैशांसह विविध आमिषे दाखवली जात असल्याने शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुज्ञ मतदार मात्र यापासून अलिप्त असल्याचे चित्र असले, तरी अखेरीस कोण अर्थकारणात वरचढ ठरतो, यावरच विजयाचे गणित अवलंबून असल्याचे तज्ज्ञ मतदारांचे मत आहे. मात्र, असे अर्थकारण लोकशाहीसाठी घातक असून शहराच्या विकासाला खिळ घालणारे ठरेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

निवडणूक विभागावर सवाल
शहरातील विविध प्रभागांत पैशांचा व वस्तूंचा खुलेआम वापर होत असल्याची माहिती असूनही निवडणूक विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. ठिकठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली असली, तरी ती केवळ नावापुरतीच असल्याची चर्चा आहे. अधिकारी व कर्मचारी केवळ औपचारिकता पूर्ण करत असल्याचे चित्र दिसत असून, लाखो रुपये खर्च करूनही निवडणूक यंत्रणा आर्थिक गैरव्यवहारावर कितपत आळा घालते, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top