Mahabreaking

[breaking_news]

A watershed festival : वरणगाव येथे वॉटरशेड महोत्सव व गावातून रॅली

A watershed festival : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत सोमवार, १६ डिसेंबर रोजी वरणगाव (ता. पातूर) येथे वॉटरशेड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

A watershed festival and a rally were held in Varangaon village.

राहुल सोनोने
दिग्रस बू : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत सोमवार, १६ डिसेंबर रोजी वरणगाव (ता. पातूर) येथे वॉटरशेड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास सरपंच सखुबाई अवचार, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, उपविभागीय जलसंधारण अधिकारी राम ठोके, तालुका कृषी अधिकारी पी. ए. राऊत, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक मंगेश सावके, ग्रामपंचायत अधिकारी खाकरे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, जलसंधारण अधिकारी प्रफुल ढाले, समाजसेवक संतोष मेसरे तसेच पाणलोट सचिव प्रशिक इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेतकरी व महिला बचत गटाच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चित्रकला स्पर्धारांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच सिमेंट नाला बांधकामाचे भूमिपूजनढाळीच्या बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष इंगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाणलोट समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top