Mahabreaking

[breaking_news]

A tanker overturned in Patur Ghat :पातूर घाटात टँकर उलटला; एक ठार, एक गंभीर

A tanker overturned in Patur Ghat :पातूर तालुक्यातील अकोला–वाशीम मार्गावर अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे. बोडखा येथील टिप्पर व बस अपघाताची घटना ताजी असतानाच, १५ डिसेंबरच्या रात्री सुमारे १२.४५ वाजता पातूर घाटात टँकर उलटून एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातात राहुल वारंजे (वय २८, रा. माहूर) असे मृतकाचे नाव आहे.

A tanker overturned in Patur Ghat

अकोला–वाशीम मार्गावर अपघातांची मालिका सुरूच

राहुल सोनोने

दिग्रस बू : पातूर तालुक्यातील अकोला–वाशीम मार्गावर अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे. बोडखा येथील टिप्पर व बस अपघाताची घटना ताजी असतानाच, १५ डिसेंबरच्या रात्री सुमारे १२.४५ वाजता पातूर घाटात टँकर पलटी होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातात राहुल वारंजे (वय २८, रा. माहूर) असे मृतकाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाशीमकडून येणारा टँकर क्रमांक टीएस २६ टी ३१५२ हा भरधाव वेगाने येत असताना पातूर घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. या अपघातात राहुल वारंजे  हा युवक जागीच ठार झाला, तर टँकर चालक शेख मोबीन शेख इब्राहिम (वय ३७, रा. यवतमाळ) हा गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच टोल नाक्यावरील डॉ. अर्जुन शर्मा, मॅनेजर अनिकेत पोहरे, आशिष किरतकर, चालक गजानन धाडसे आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमीस तात्काळ मदत केली. तसेच पातूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल वासिमोद्दीन शेख, सूर्यवंशी, चालक साबे मेजर आदींनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top