Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

A motorcyclist was injured : भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी ; बोरगाव मंजू नवीन बायपास नजीकची घटना

A motorcyclist was injured : राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोरगाव मंजू नवीन बायपास व वाशिंबा नवीन बायपास हा परिसर दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. डी. के. हॉटेल चौक परिसरात दिवसाआड लहान-मोठे अपघात घडत असून, मंगळवारी सकाळच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात मोठा अनर्थ टळला.

A motorcyclist was injured
अपघातांची मालिका सुरूच, बायपास ठरत आहे धोकादायक

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोरगाव मंजू नवीन बायपास व वाशिंबा नवीन बायपास हा परिसर दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. डी. के. हॉटेल चौक परिसरात दिवसाआड लहान-मोठे अपघात घडत असून, मंगळवारी सकाळच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात मोठा अनर्थ टळला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार अमोल वाडेवाले व आदित्य ढवळे (रा. बोरगाव मंजू) हे दुचाकी (क्र. एमएच ३० ए डब्ल्यू ३९२२) वरून बोरगाव मंजूकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस (क्र. एमएच १४ एमएच ०५०९) च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात अमोल वाडेवाले व आदित्य ढवळे हे दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच हेडकॉन्स्टेबल प्रमोद डोईफोडे, महादेव पातोंड, नारायण शिंदे, शुभम फलके यांच्यासह बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चालकासह बस ताब्यात घेण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत डोंगरगाव बस थांबा, वाशिंबा नवीन बायपास वाय-पॉइंट, सोनाळा रोड चौफुली, डी. के. हॉटेल चौक नवीन बायपास आदी ठिकाणी दिवसाआड अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वणी-रंभापूर बस थांबा नजीक अपघात रोखण्यासाठी सर्व्हिस रोड व पुलाचे बांधकाम सुरू असले तरी इतर ठिकाणी तातडीच्या उपाययोजना आवश्यक असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

सुदैवाने मोठा अनर्थ टळला

यवतमाळ आगाराची एसटी बस सुमारे ६० प्रवासी घेऊन संभाजीनगरकडे जात होती. अपघातानंतर बस महामार्गावरील दुभाजक भिंतीवर अडकली, तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. बस रस्त्याच्या कडेला घसरली असती, तर प्रवाशांनाही इजा होण्याची शक्यता होती.

प्रवाशांचा प्रवास विस्कळीत

बोरगाव मंजू नवीन बायपासवरील डी. के. हॉटेल चौकात अपघात झाल्याने बसमधील प्रवाशांच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला व त्यांना नियोजित वेळेत गंतव्यस्थळी पोहोचता आले नाही.

बस थांब्यावर न थांबता बायपासनेच मार्गक्रमण

बोरगाव मंजू हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत बस थांबा आहे. मात्र मुर्तिजापूरकडून व अकोल्याकडून येणाऱ्या अनेक बस थांब्यावर न थांबता थेट बायपासवरून मार्गक्रमण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना ‘थांबा नाही’ असे सांगून चालक व वाहकांमध्ये वाद होण्याचे प्रकारही घडत आहेत. या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top