Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

712 brass of illegal sand seized : रेती माफीयांविरुध्द धडक कारवाई;  दीड महिन्यात ७१२ ब्रास अवैध रेती जप्त  

 712 brass of illegal sand seized : तालुक्यात अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने गेल्या दीड महिन्यात मोठी कारवाई राबवून ७१२ ब्रास रेती जप्त केली. जप्त साठा शासकीय कामांसाठी १,५०० रुपये प्रति ब्रास दराने उपलब्ध करून देत महसुलात तब्बल ₹१०,६८,००० इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

illegal sand seized

   ₹१०.६८ लाखांचा महसूल ; देऊळगाव राजा तहसील प्रशासनाची कारवाई

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यात अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने गेल्या दीड महिन्यात मोठी कारवाई राबवून ७१२ ब्रास रेती जप्त केली. जप्त साठा शासकीय कामांसाठी १,५०० रुपये प्रति ब्रास दराने उपलब्ध करून देत महसुलात तब्बल ₹१०,६८,००० इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटीलउपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल पथकाने संयुक्तरीत्या केली.

खडकपूर्णा जलाशय परिसरात मेहुणाराजा, चिंचखेड, सुलतानपूर, सिनगाव जहाँगीर व खल्याळ गव्हान येथे अवैध रेती उत्खननासाठी जाणारे मार्ग चर खोदून बंद करण्यात आले. अवैध उत्खननासाठी खोदलेले खडडे, तात्पुरते साठे व वापरातील साहित्य JCB व पोकलँडच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले.

खडकपूर्णा धरणाच्या प्रवेशद्वाराजवळ अवैध उत्खनन रोखण्यासाठी दोन मोठी लोखंडी गेट बसविण्यात आली असून आणखी तीन ठिकाणी गेट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय धरण परिसरातील सहा ठिकाणी CCTV कॅमेरे बसवून सतत देखरेख ठेवली जात आहे.

कारवाईदरम्यान पथकाने 28 नोव्हेंबर रोजी – 1 ट्रॅक्टर, 30 नोव्हेंबर रोजी – 2 टिप्पर, 3 डिसेंबर रोजी – 1 टिप्पर अशी एकूण 4 वाहने जप्त करून पोलिस स्टेशनमध्ये अटकाव केली. याशिवाय 15 ऑगस्ट 2025 रोजी 15 जणांवर गुन्हे दाखल केले. तसेच 17 नोव्हेंबर 2025  रोजी 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अवैध उत्खननाचा कोणताही प्रयत्न केल्यास बोटीच्या सहाय्याने त्वरित कारवाई केली जाईल, असे तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष गस्ती पथक स्थापन करण्यात आले आहे.ही सर्व कारवाई तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top