Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Farmers angry :नाफेडच्या जाचक अटींवर शेतकऱ्यांचा संताप; वाडेगावात रास्ता रोको, तासभर वाहतूक ठप्प

Farmers angry :नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी प्रक्रियेत लावण्यात येणाऱ्या किचकट आणि जाचक अटींच्या निषेधार्थ वाडेगाव येथे शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. खरेदी केंद्रावर सोयाबीन स्वीकारले जात नसल्याने रोषात भर पडली असून अनेक शेतकऱ्यांना माल पुन्हा परत घेऊन जाण्याची वेळ आली आहे.

Farmers angry

राहुल सोनोने 

वाडेगाव  : नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी प्रक्रियेत लावण्यात येणाऱ्या किचकट आणि जाचक अटींच्या निषेधार्थ वाडेगाव येथे शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. खरेदी केंद्रावर सोयाबीन स्वीकारले जात नसल्याने रोषात भर पडली असून अनेक शेतकऱ्यांना माल पुन्हा परत घेऊन जाण्याची वेळ आली आहे.

शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून क्रमांक मिळाल्यानंतर शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर पोहोचत आहेत. मात्र वाडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेड खरेदी केंद्रावर तपासणी दरम्यान बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन निकषांत बसत नसल्याचे कारण देत खरेदी नाकारली जात असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बसस्थानक परिसरात मार्ग अडवून रास्ता रोको केला. सकाळी सुमारे अकरा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे बाळापूर–पातूर मार्गावरील वाहतूक तब्बल तासभर ठप्प झाली. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, नायब तहसीलदार सैय्यद, बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे, पीएसआय संभाजी हिवाळे तसेच खरेदी-विक्री संघाचे संचालक मनोहर राहणे यांनी धाव घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. जाचक अटी व अडचणींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  त्यानंतर शेतकरी नाफेड केंद्रावर जाऊन ग्रेडरकडून शासकीय परिपत्रक दाखविण्याची मागणी करत ठाम भूमिका घेत होते. मात्र दुपारी दीड वाजेपर्यंत कोणताही संबंधित अधिकारी उपस्थित न झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या संपूर्ण घडामोडीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून ही तातडीची समस्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडतील का? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top