Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Andhera Phata area : अंढेरा फाटा परिसरात धाडसी चोरी; २.४३ लाखांचा ऐवज केला लंपास

Andhera Phata area : पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात चोरट्यांनी हात साफ करीत 2.43 लाखांचा एवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अंढेरा फाटा येथे राहणारे आणि बुलढाणा वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले विष्णू कारभारी काकड (वय ३५) यांच्या घरात ही चोरी झाली.

Andhera Phata area
पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेले घर चोरट्यांनी फोडले

गजानन भालेकर 
धोत्रा नंदाई : पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात चोरट्यांनी हात साफ करीत 2.43 लाखांचा एवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अंढेरा फाटा येथे राहणारे आणि बुलढाणा वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले विष्णू कारभारी काकड (वय ३५) यांच्या घरात ही चोरी झाली.
४ डिसेंबर रोजी फिर्यादी बुलढाणा येथे कामानिमित्त असताना गावातील राम राठोड यांनी फोनवर घरात चोरी झाल्याची माहिती दिली. तत्काळ घरी परतल्यानंतर घराचे पाठीमागील उघडे दार उचकटले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील रोख रक्कम व दागदागिने असा एकूण ₹२,४३,००० किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.चोरट्यांनी १ लाख ३० हजार रोख, ३ तोळे चांदीची चैन किंमत पाच हजार, ४ तोळे सोन्याची साखळी किंमत एक लाख, गॅस सिलेंडर व भांडी किंमत ८,००० असा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले. घटनास्थळावरून काही ठसे हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.गावात पोलीस स्टेशन असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरी होणे हा सुरक्षेवरील प्रश्नचिन्ह ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“पोलीस स्टेशनच्या हद्दीतच चोरी होत असेल तर ग्रामस्थांनी सुरक्षिततेसाठी कुणावर विश्वास ठेवायचा?” असा प्रश्न नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे.
देऊळगाव राजा उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रुपेश शक्करगे, तसेच तपास अधिकारी दुय्यम ठाणेदार दिनेश घुगे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top