Mahabreaking

[breaking_news]

cotton purchase limit: शेतकऱ्यांना मोठा दिलासा : सीसीआयकडून कापूस खरेदी मर्यादेत वाढ!

cotton purchase limit: शेतकऱ्यांना मोठा दिलासा : सीसीआयकडून कापूस खरेदी मर्यादेत वाढ!

cotton purchase

समाधान शिंगणे यांच्या पुढाकाराला यश

गजानन भालेकर 

धोत्रा नंदई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर झाला असून कापूस खरेदी मर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सीसीआयने घेतला आहे. देऊळगाव राजा पंचायत समितीचे सभापती समाधान शिंगणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

कृषी विभागाने ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील सुधारित कापूस उत्पादकतेचा अहवाल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे सादर केला होता. या अहवालाच्या आधारे सीसीआयने ५ नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय खरेदी मर्यादा वाढविण्याचा निर्णय कळवला.

चालू हंगामात सीसीआयने नोंदणीच्या जाचक अटी आणि कमी खरेदी मर्यादा लागू केल्याने शेतकरी संकटात सापडले होते. ही परिस्थिती पाहून सभापती समाधान शिंगणे यांनी शासनदरबारी ठोस पाठपुरावा सुरू केला. मागील वर्षाप्रमाणे प्रतिहेक्टर ३० क्विंटल निकष लागू करण्याची मागणी त्यांनी केली तसेच गरज पडल्यास आंदोलनाचा इशाराही दिला.

शिंगणे यांच्या मागणीची दखल घेत अखेर शासनाने प्रतिएकर ६.३६ क्विंटल कापूस खरेदीला मान्यता दिली. कृषी विभागाने २०२४–२५ मधील कापणी प्रयोगातील सरासरी व उच्च उत्पादकता असलेल्या २५ टक्के प्रयोगांचा आधार घेत हा अहवाल तयार केल्याचे सांगितले. एकाच शेतातील विविध भागांमध्ये उत्पादकतेत फरक असल्याने सरासरीऐवजी कमाल उत्पादकता ग्राह्य धरण्याची मागणीही शिंगणे यांनी अधोरेखित केली होती.

नव्या प्रस्तावानुसार प्रतिएकर १ ते २ क्विंटल वाढ करण्यात आली आहे. राज्यातील बहुतेक शेतकरी प्रतिएकर १० ते १५ क्विंटल उत्पादन घेत असल्याने ही वाढ त्यांना काही प्रमाणात दिलासा देणारी ठरणार आहे.शेतकरीहितासाठी केलेल्या समाधान शिंगणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा निर्णय मार्गी लागल्याची ग्रामीण भागातून प्रतिक्रिया उमटत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top