Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

World Disability Day: अकोल्यात जागतिक अपंग दिनानिमित्त भव्य रॅलीसह विविध कार्यक्रम

World Disability Day:  जागतिक अपंग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा अकोला व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर २०२५ रोजी अकोला शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने संपूर्ण शहरात सामाजिक ऐक्य व जनजागृतीचा संदेश देणारी ही रॅली विशेष ठरली.

World Disability Day

दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती; गुणगौरव, मार्गदर्शन व विवाहसोहळ्याने कार्यक्रम संस्मरणीय

राहुल सोनोने

 वाडेगाव :  जागतिक अपंग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा अकोला व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर २०२५ रोजी अकोला शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने संपूर्ण शहरात सामाजिक ऐक्य व जनजागृतीचा संदेश देणारी ही रॅली विशेष ठरली.

मुख्य पोस्ट ऑफिसजवळून निघालेल्या रॅलीला दिगंबर लोखंडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
रोशनी बन्सल — सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मा. डॉ. तुषार जाधव — दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी,
जि.प., दिलीप जाधव — उपायुक्त, मनपा, हरिश्चंद्र ईटकर — शिक्षणाधिकारी, मनपा, अरविंद सोनकांबळे — अधिष्ठाता, डॉ. पं. दे. कृ. वि., मा. दिनकरराव काळे — राज्य संचालक व विदर्भ निरीक्षक, म.रा. अपंग कर्मचारी संघटना, संजय बरडे — राज्य उपाध्यक्ष, म.रा. अपंग कर्मचारी संघटना या मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्‌घाटन केले. रॅलीने नवीन बसस्थानक, गांधी चौक, पंचायत समिती असा मार्ग काढत शहरात जनजागृती केली.

World Disability Day

गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार वितरण

मनपा हिंदी शाळा क्र. ४, चिवचिव बाजार येथे झालेल्या मुख्य समारंभात सेवानिवृत्त दिव्यांग कर्मचारी/अधिकारी : मा. दिलीप सरदार, मा. जावेद इकबाल, मा. प्रकाश इंगळे
यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दिव्यांग गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

स्वयंपूर्णतेकडे दिव्यांग बांधवांचे मार्गदर्शन

दुसऱ्या सत्रात जिल्हा उद्योग केंद्राचे  प्रसन्न रत्नपारखी यांनी ‘दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार व कौशल्य विकासाच्या संधी’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

दिव्यांग उपवर-वधू परिचय मेळाव्यात विवाहसोहळा

परिचय मेळाव्यातून कु. जया संतोष विदोकारमयुर ज्ञानेश्वर बारब्दे यांचा विवाह संमतीने लावून देण्यात आला. सर्व उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात हा सोहळा पार पडला.

यशस्वी आयोजनासाठी समितीची परिश्रमपूर्वक साथ

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय बरडे (अध्यक्ष), मो. अजिज (सचिव), दिलीप सरदार (कोषाध्यक्ष), प्रविण फुले, सुनिल वानखडे, सुधीर कडू, राजेश रौंदळे, रामेश्वर कवळे, गणेश अत्तरकर, सुनिल कवळे, रविंद्र सिरसाठ, गणेश महल्ले, किशोर वानखडे, मनोज जयस्वाल, किशोर तायडे, कु. माधुरी देठे, उज्वला शर्मा, शबाना पटेल, दिपाली रोठे, मिरा डिघोडे, अनुराधा शेंडे, शितल नैताम, शिल्पा वाघमारे, अर्चना देशमुख, श्रीकांत देशमुख, दिव्यांग बेरोजगार संघटनेचे पदाधिकारी
यांनी विशेष योगदान दिले. राष्ट्रगीताने या भव्य कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top