Son kills parents : शेतीच्या वादातून पाेटच्या मुलानेच आई वडीलांची बाजीच्या लाकडाने वार करून हत्या केल्याची घटना २७ सप्टेंबर राेजी उघडकीस आली आहे. चिखली तालुक्यातील किन्ही सवडद येथील या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महादेव त्र्यंबक चोपडे (७०) व कलावतीबाई महादेव चोपडे (६५) अशी मृतकांची नावे आहेत तर गणेश महादेव चोपडे असे आराेपी मुलाचे नाव आहे.

किन्ही सवडद येथील घटना : बाजीच्या लाकडाने केले वार
बुलढाणा : शेतीच्या वादातून पाेटच्या मुलानेच आई वडीलांची बाजीच्या लाकडाने वार करून हत्या केल्याची घटना २७ सप्टेंबर राेजी उघडकीस आली आहे. चिखली तालुक्यातील किन्ही सवडद येथील या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महादेव त्र्यंबक चोपडे (७०) व कलावतीबाई महादेव चोपडे (६५) अशी मृतकांची नावे आहेत तर गणेश महादेव चोपडे असे आराेपी मुलाचे नाव आहे.
मृत महादेव चोपडे यांना दोन मुले आहेत. आरोपी गणेश हा धाकटा मुलगा असून, दोन्ही मुलांना जमिनीचे हिस्से देण्यात आले होते. मात्र, आई कलावतीबाई यांच्या नावे असलेली जमीन विकण्याबाबत घरात वाद सुरू होता. शनिवारी त्यावरून पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात गणेशने आई-वडिलांना लाकडाने मारून ठार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने गावात दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले.या दुहेरी हत्याकांडाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक नीलेश तांबे आणि उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

