Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

election enthusiasm: एका आदेशाने निवडणूक उत्साहावर पडले विरजण…

election enthusiasm: देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक प्रक्रियेला केवळ काही तास बाकी असतानाच काल सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त होताच निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेल्या वातावरणावर अचानक विरजण पडले. नगराध्यक्ष पदाबरोबरच प्रभागनिहाय नगरसेवकांच्या निवडणूक प्रक्रियेला काही दिवसांसाठी स्थगिती मिळाल्याने मतदार व उमेदवारांच्या उत्साहावर एक प्रकारे पाणीच फिरले.

muncipal election
देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक रणसंग्रामाला लागला काही दिवसांचा ब्रेक

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक प्रक्रियेला केवळ काही तास बाकी असतानाच काल सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त होताच निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेल्या वातावरणावर अचानक विरजण पडले. नगराध्यक्ष पदाबरोबरच प्रभागनिहाय नगरसेवकांच्या निवडणूक प्रक्रियेला काही दिवसांसाठी स्थगिती मिळाल्याने मतदार व उमेदवारांच्या उत्साहावर एक प्रकारे पाणीच फिरले.

महाराष्ट्रातील इतर नगरपालिकांसह देऊळगाव राजा नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली होती. प्रचार यंत्रणा उत्कंठेच्या शिगेला पोहोचलेली असताना न्यायालयीन प्रक्रियेच्या कारणास्तव निवडणूक प्रक्रिया काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत तसेच प्रभागांतील विविध लढती रंगतदार ठरणार होत्या. काल सायंकाळपर्यंत विविध प्रभागांमध्ये उमेदवार आणि त्यांच्या पॅनलच्या नेत्यांच्या रॅल्या सुरू होत्या. मतदारांचा उत्साहही पाहण्यासारखा होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश लागताच सर्व प्रचारकार्य अचानक थांबले.

आर्थिक घोडेबाजाराला ब्रेक लागणार का?
नगरपालिका निवडणुकीतील शेवटच्या दोन दिवसांत मतदारांना दिले जाणारे आमिष, पैशांची उधळण आणि त्यातून निर्माण होणारा आर्थिक घोडेबाजार काही उमेदवारांनी सुरू केला होता. आधीच प्रचारामुळे आर्थिकदृष्ट्या ताणलेल्या उमेदवारांची या आदेशामुळे मोठी घालमेल झाली आहे. आधी झालेला खर्च आणि पुढील संभाव्य खर्च पाहता उमेदवारांची धावपळ आता अधिक वाढण्याची शक्यता आहे. होणारा आर्थिक घोडेबाजार रोखण्यासाठी प्रशासन किती सक्षम ठरते, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

काय आहे प्रकरण — ज्यामुळे निवडणूक पुढे ढकलली?
पालिका निवडणुकीदरम्यान विहित मुदतीत निर्मला खैरनार यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामधील झालेल्या चुकांच्या आधारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. यावर त्यांनी केलेले अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली.

महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 मधील कलम 15 अंतर्गत 21 नोव्हेंबर रोजी खामगाव जिल्हा न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमध्ये विविध त्रुटींचा उल्लेख करण्यात आला होता—
• कालबाह्य नोटीसद्वारे प्रमाणित प्रतिज्ञापत्रे
• शपथपत्रांवर उमेदवारांच्या स्वाक्षऱ्यांचा अभाव
• राष्ट्रीय पक्षांनी दिलेल्या एबी फॉर्ममध्ये चुकीचे प्रभाग क्रमांक
या गंभीर चुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्या. या त्रुटींमुळे उमेदवारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

बाद झालेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने सुधारित वेळापत्रकानुसार निवडणूक राबवण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून जिल्हा प्रशासनाने त्याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

पुढील वेळापत्रक :
ही न्यायालयीन प्रक्रिया फक्त नगराध्यक्ष पदापुरती असल्याने प्रभागनिहाय उमेदवारी जैसे थे राहणार आहे.
• नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत : 10 डिसेंबर, दुपारी 3 वाजेपर्यंत
• निवडणूक चिन्ह वाटप : 11 डिसेंबरपर्यंत
• मतदान : 20 डिसेंबर, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
• मतमोजणी व निकाल : 21 डिसेंबर, सकाळी 10 वाजल्यापासून

निवडणूक खर्चाबाबत विचारणा केली असता सुधारित आदेश अद्याप प्राप्त नसल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top