Mahabreaking

[breaking_news]

 Buldhana municipal elections : बुलढाणा पालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, दोन जणांना घेतले ताब्यात

Buldhana municipal elections : बुलढाणा नगर पालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Buldhana municipal elections
एक जण फरार, समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

बुलढाणा : बुलढाणा नगर पालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा प्रकरण लावून धरले होते. त्यानंतर हा मुद्दा देशातच नव्हे तर राज्यातही गाजला आहे. बुलढाण्यातही बोगस मतदार असल्याचा आरोप शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही केला होता. त्यांनतर आज 2 डिसेंबर रोजी बुलढाणा नगर पालिकेच्या प्रभाग 15 मधील गांधी प्राथमिक शाळा या केंद्रावर दोन जण बोगस मतदान करण्यासाठी आले होते. तेथे उपस्थित नागरिकांच्या निद र्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी या दोघांना विचारपूस केली. त्यांनी आम्हाला येथे आणण्यात आल्याचे सांगितले. तसेच आणखी एका युवकानेही बोगस मतदान केल्याचे समोर येत आहे. या बोगस मतदानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top