Women’s hunger strike: सार्वजनिक मालमत्ता व दलीत वस्ती मधील शासकीय रस्त्यावर असलेला ताबा हटविण्याबाबत, व मुख्यरस्त्यावरील हातपंप जवळ केलेले अतिक्रमण मोकळे करण्यासाठी भंडाराज बू येथील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सम्राट दिलीप तायडे व समस्त गावकरी मंडळी व महिला यांच्यासह सोमवार १ डिसेंबर पासून उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे

शासकीय रस्त्यावरील ताबा हटवा, अतिक्रमण काढण्याची मागणी
राहुल सोनोने
दिग्रस बू:- सार्वजनिक मालमत्ता व दलीत वस्ती मधील शासकीय रस्त्यावर असलेला ताबा हटविण्याबाबत, व मुख्यरस्त्यावरील हातपंप जवळ केलेले अतिक्रमण मोकळे करण्यासाठी भंडाराज बू येथील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सम्राट दिलीप तायडे व समस्त गावकरी मंडळी व महिला यांच्यासह सोमवार १ डिसेंबर पासून उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे
दिलेल्या तक्रारी नुसार भंडारज बु। मधील सार्वजनिक बोअर वेल हातपंप १९९५ पासून कार्यरत तसेच २०१९ व २०२० मध्ये तयार केलेला दलीत वस्तीत जाणारा मुख्य रस्ता आणि २०१९ मध्ये तयार केलेली रमाई परस बाग , शासकीय व सार्वजनिक मालमत्तेवर एका व्यक्तीने अनधिकृतपणे ताबा केला असून सलग तीन वर्षापासून प्रयत्न करत आहेत. आता तर त्या व्यक्तीने या शासकीय / सार्वजनिक मालमत्तेवर सिमेंट, लोह व विटांचे पक्के बांधकाम ठरून ताबा बसविला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत चालू बोअर वेल व मुख्य रस्त्यावरील या व्यक्तीने ताबा बसविल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा टंचाईचा सामना -करावा लागत आहे व अशा अनेक अडचणीचा सामना सदर व्यक्ती चा ताबा हटवून कायदेशीर कार्यवाही करावी ही विनंती सम्राट तायडे यांच्या सह समस्त गावकरी मंडळी, यांच्याकडून करण्यात आली आहे. संजय इंगळे, नरेंद्र सुरवाडे,किशोर सुरवाडे,प्रतीक इंगळे,ललिता अवसरमोल आदी शेकडो ग्रामस्थ महिलांसह उपोषणाला बसलेले आहेत.

