Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

 ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’

‘Farmer Cup : महाराष्ट्र शासन, कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप शेतकरी प्रशिक्षण तहसील कार्यालय सभागृह अकोला येथे समारोप झाला,प्रशिक्षणाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

'Farmer Cup

​अकोला : महाराष्ट्र शासन, कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप शेतकरी प्रशिक्षण तहसील कार्यालय सभागृह अकोला येथे समारोप झाला,प्रशिक्षणाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
​दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर यांनी केले आपल्या प्रास्ताविकातून कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली दरम्यान फार्मर कप प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला,सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी विजय वानखेडे यांनी केले.
​ प्रशिक्षणादरम्यान, पाणी फाउंडेशनच्या अमरावती विभागीय समन्व्यक उज्वल बोलवर अकोला जिल्हा समन्वयक संघपाल वाहूरवाघ , अनुराधा घोरड lआणि त्यांच्या टीमने शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. पाणी फाउंडेशनच्या टीमने जलसंधारण, मृद व जल व्यवस्थापन, शेतीत पाण्याचा कार्यक्षम वापर आणि नैसर्गिक शेतीचे महत्व यांसारख्या विषयांवर तांत्रिक व व्यावहारिक माहिती दिली.
​महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या समन्वयातून शेतकरी सक्षम बनवण्याचे ध्येय या प्रशिक्षणातून अधोरेखित झाले. कृषी विभागाने शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबद्दल माहिती पुरवली, तर पाणी फाउंडेशनने पाण्याच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर काय उपाययोजना करता येतील, यावर लक्ष केंद्रित केले.
​प्रशिक्षणात उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन तज्ज्ञांनी केले. यावेळी, ” शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी” हा कृषी विभागाचा संकल्प आणि पाणी फाउंडेशनच्या जलसाक्षरतेचा संदेश एकाच व्यासपीठावर प्रभावीपणे मांडला गेला, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top