Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Police raid : अवैध देशी, हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र

Police raid : ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत बोरगाव मंजू पोलिसांनी सांगळुद, सुकळी, धोतर्डी आणि पळसोबढे परिसरातील अवैध देशी व हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाडसत्र राबवून चार जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. २७ नोव्हेंबर रोजी राबविण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ४४,३६० रुपयांचा ऐवज जप्त करून अवैध अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

Police raid
एकाच आठवड्यात दुसरी कारवाई ; ४४ हजारांचा ऐवज हस्तगत
संजय तायडे

बोरगाव मंजू : ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत बोरगाव मंजू पोलिसांनी सांगळुद, सुकळी, धोतर्डी आणि पळसोबढे परिसरातील अवैध देशी व हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाडसत्र राबवून चार जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. २७ नोव्हेंबर रोजी राबविण्यात आलेल्या या कारवाईत एकूण ४४,३६० रुपयांचा ऐवज जप्त करून अवैध अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सागळुद येथे अवैधरित्या देशी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पाळत ठेवून शिवनारायण जयस्वाल यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडे देशी दारूच्या २६० बाटल्या जप्त करण्यात येऊन १०,४०० रुपयांचा ऐवज हस्तगत झाला.यानंतर सुकळी येथील नदीकाठावर हातभट्टी दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला. येथे २० लिटर हातभट्टी दारू (किंमत ४,००० रु.) आणि १२० लिटर सडवा-मोह (किंमत १२,००० रु.) असा एकूण १६,००० रुपयांचा ऐवज जप्त करून श्रीकृष्ण भाटी यास ताब्यात घेण्यात आले.तद्वतच, धोतर्डी येथील नदीकाठी छापा टाकताना हातभट्टी दारू ५० लिटर (किंमत १०,००० रु.) आणि सडवा-मोह ७० लिटर (किंमत ७,००० रु.) असा एकूण १७,००० रुपयांचा ऐवज जप्त करून विठ्ठल बिलेवार यास अटक करण्यात आली.पळसोबढे येथे अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या दीपक सरदार यास पाळत ठेवून पकडण्यात आले. त्याच्याकडील १२ बाटल्या (किंमत ९६० रु.) जप्त करण्यात आल्या.गुरुवारी दिवसभर राबवलेल्या या धाडसत्रात बोरगाव मंजू पोलिसांनी चार जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. अवैध दारूविरोधातील ही एकाच आठवड्यातील दुसरी मोठी कारवाई ठरली.ही मोहीम जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र धुळे, मनोज उघडे, हेडकॉन्स्टेबल प्रमोद गोपनारायन, उमेश पुरी, सुदिप राऊत, अक्षय देशमुख, अनिल आंबिलकर आणि शेखर कोद्रे यांनी सहभाग घेतला.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top