Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

 ‘ISRO Vimanavari’:‘इस्त्रो विमानवारी’साठी जिल्हास्तरीय निवड चाचणी उत्साहात

 ‘ISRO Vimanavari’:भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) बंगळुरू तसेच दक्षिण भारतातील विविध वैज्ञानिक स्थळांना विमानवारीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहलीसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी बी.आर. हायस्कूल, अकोला येथे घेण्यात आली. सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत झालेल्या या चाचणीत जिल्ह्यातील सर्व २१० विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि गोपनीय पद्धतीने पार पडली.

'ISRO Vimanavari'

मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांची परीक्षा केंद्राला भेट

अकोला : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) बंगळुरू तसेच दक्षिण भारतातील विविध वैज्ञानिक स्थळांना विमानवारीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहलीसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी बी.आर. हायस्कूल, अकोला येथे घेण्यात आली. सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत झालेल्या या चाचणीत जिल्ह्यातील सर्व २१० विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि गोपनीय पद्धतीने पार पडली.

परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सूचना देण्यात आल्या. दरम्यान, जिल्हा परिषद अकोलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी केंद्रावर आकस्मिक भेट देत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली.

ही चाचणी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रतनसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
परीक्षा नियंत्रक म्हणून जितेंद्रकुमार प्रधान (उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक) यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून परीक्षा आयोजन, निकाल प्रक्रिया आणि गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड यावर देखरेख केली.

केंद्र संचालक अरविंद जाधव (विस्तार अधिकारी शिक्षण) यांनी संपूर्ण व्यवस्थापन पाहिले, तर प्रश्नपत्रिका व OMR शीटसारखे गोपनीय साहित्य केंद्रावर सुरक्षितरीत्या पोहोचविण्याची जबाबदारी श्याम राऊत (विस्तार अधिकारी शिक्षण) यांनी कस्टोडियन म्हणून पार पाडली.

अकोला आणि बाळापूर येथील विशेष शिक्षकांनी परीक्षा पर्यवेक्षक म्हणून कर्तव्य बजावले. चाचणीच्या यशस्वी आयोजनासाठी   प्राचार्य, बी.आर. हायस्कूल अकोला, तसेच चाचणीसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचे पालक, वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top