Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

 NAFED : नाफेडच्या धान्य खरेदी केंद्रांची संख्या वाढवा; अन्यथा रास्ता रोको

 NAFED : पातूर तालुक्यात नाफेडचे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी संपूर्ण तालुक्यासाठी केवळ एकच केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर आजपर्यंत २३०० ते २४०० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून, इतक्या मोठ्या प्रमाणातील माल खरेदी करणे एका केंद्रावर अशक्य असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खरेदी केंद्रांची संख्या तातडीने वाढविण्याची मागणी शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

NAFED

शेतकरी राजा ग्रुप पातूर तालुक्याच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

राहुल सोनोने

 वाडेगाव : पातूर तालुक्यात नाफेडचे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी संपूर्ण तालुक्यासाठी केवळ एकच केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर आजपर्यंत २३०० ते २४०० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून, इतक्या मोठ्या प्रमाणातील माल खरेदी करणे एका केंद्रावर अशक्य असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खरेदी केंद्रांची संख्या तातडीने वाढविण्याची मागणी शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

भूतकाळाचा उल्लेख करत निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेल्या वर्षी तालुक्यात ४ ते ५ नाफेड खरेदी केंद्रे सुरू होती, तरीही सोयाबीन खरेदी जून महिन्यापर्यंत चालली होती आणि काही शेतकरी खरेदीपासून वंचित राहिले होते. यंदा शेतकरी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कोणत्याही नव्या अटी-शर्ती लादू नयेत, तसेच गेल्या वर्षी जसे सर्व केंद्रे सुरू होती, तसेच सर्व केंद्रे पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

९ डिसेंबरला रास्ता रोकोचा इशारा

जर खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली नाही किंवा प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर दि. ९ डिसेंबर रोजी पातूर येथे मोठा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्यास प्रशासन पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा शेतकरी राजा ग्रुपने दिला आहे.

खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात

निवेदनात असेही नमूद आहे की, यंदा नाफेड खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी आवश्यक असलेली भांडवलाची गरज भागत नाही. बाजारात सध्या सोयाबीनचा दर ,००० ते ४,५०० रुपयांदरम्यान आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.खरेदी केंद्र तातडीने सुरू करावीत, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देणाऱ्यांमध्ये रवि सोनोने (अध्यक्ष), ज्ञानेश्वर गाडगे, दशरथ सरदार, माजी सरपंच संजय शर्मा, सदानंद कवळकर यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top