Mahabreaking

[breaking_news]

Ajitdada Pawar : मतदारसंघातील शहरांच्या विकासासाठी एकदा संधी द्या, त्याचे सोने करू :  अजितदादा पवार

Ajitdada Pawar : मतदारसंघातील सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला एकदा संधी द्या, संधी मिळाल्यास तिचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊळगाव राजा येथे आयोजित प्रचारसभेत काढले.

Ajitdada Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रचार सभेला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

 गजानन तिडके 

देऊळगाव राजा : मतदारसंघातील सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला एकदा संधी द्या, संधी मिळाल्यास तिचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊळगाव राजा येथे आयोजित प्रचारसभेत काढले.

अजित पवार म्हणाले की, दोन्ही शहरांना अत्यंत समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. देऊळगाव राजा येथे ‘प्रति तिरुपती’ म्हणून ओळखले जाणारे श्री बालाजी महाराज मंदिर तर सिंदखेड राजा येथे स्वराज्य जननी मा. जिजाऊ मातांचे जन्मस्थान आहे. या सर्व वारशांनंतरही ज्यांच्याकडे २५ ते ३० वर्षे सत्ता होती, त्यांना विकासाची व्याख्याच समजली नाही.ज्यांना वडिलोपार्जित सहकारी संस्था—दुसऱ्याबीड येथील सहकारी साखर कारखाना आणि सूतगिरणी—देखील व्यवस्थित चालवता आली नाहीत, अशांना मदतीसाठी बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटींची भरीव मदत दिली गेली; तरीसुद्धा ती बँक नीट चालवता आली नाही, अशी टीका त्यांनी केली. राजकीय क्षेत्रात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले लोक आता शहराच्या विकासाच्या नावाखाली एकत्र येत आहेत. ही त्यांची युती नसून स्वार्थी प्रवृत्ती आहे, असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.

Ajitdada Pawar

आमदार कायंदे यांनी सादर केला शहराच्या विकासाचा आराखडा

देऊळगाव राजा शहर विकासाचा सविस्तर कृती आराखडा आमदार मनोज कायंदे यांनी सादर केला आहे. त्यात देऊळगाव राजा येथे नाट्यगृह, भव्य ग्रंथालय, अभ्यासिका, वळण रस्ता विकास, भूमिगत गटार यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा समावेश असल्याचे पवार म्हणाले. या प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

आमदार कायंदेच्या कामाचे अजित पवार यांनी केले कौतुक

आमदार कायंदे यांनी अल्पावधीत केलेल्या कामाची प्रशंसा करत पवार म्हणाले की, ‘‘आपल्याला सक्षम युवा नेतृत्व लाभले आहे. या संधीचे आपण सोने करावे. अभद्र युतीला मतदान करू नका. दोन्ही नगरपालिकेत आपली माणसे बसवा, म्हणजे विकासाला वेग येईल.’’सभेदरम्यान ‘आजा न’ सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी काही क्षण भाषण थांबवले आणि नंतर पुन्हा सुरुवात केली.

Ajitdada Pawar

सिंदखेडराजात विरोधात लढणारे दे.राजात माञ एकत्र येतात

आमदार मनोज कायंदे म्हणाले, ‘‘देऊळगाव राजा येथे ते युती करून लढतात, तर सिंदखेड राजा येथे एकमेकांविरोधात उभे राहतात. हे मतदारांच्या लक्षात आले आहे. आता मतदार त्यांच्या वल्गणांना बळी पडणार नाहीत. योग्य निर्णय आपणच घ्यावा.’’असेही कायंदे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला  आमदार मनोज कायंदे, आमदार अमोल मिटकरी, आमदार सुभाष खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझर काझी, दिलीप खरात, डॉ. गणेश मांटे, सतीश कायंदे, सिद्दिक शेख, संतोष खांडेभराड, दिलीप सानप, नितीन कायंदे, दिलीप झोटे, भगवान मुंडे, गजानन काकडे, सुनील शेजुळकर, प्रा. सदाशिव मुंडे, सुभाष दराडे, देऊळगाव राजा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधुरी शिंपणे आणि सिंदखेड राजा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्याम मेहेत्रे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप व मित्रपक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top