Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

Woman molested : आस्टुल येथील महिलेचा विनयभंग,आरोपीविरुध्द गुन्हा दाखल 

Woman molested : पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील आस्टूल येथे घरात एकटी असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

Woman molested

पातूर : पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील आस्टूल येथे घरात एकटी असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

 फिर्यादी महिलेचा पती गेले दोन महिने मेहकर येथे कामानिमित्त राहतो. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी साधारण आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आपल्या घराच्या अंगणात कपडे वाळत घालत असताना आरोपी तिच्याकडे वाईट हेतूने आला. यापूर्वीही आरोपीने त्रास दिल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. तो तिचा हात पकडून तिला घरात ओढू लागला. महिलेने आरडाओरडा करताच तिचा मुलगा घरातून बाहेर धावत आला आणि शेजारील नागरिकही जमा झाल्याने आरोपी संजय गोविंदा मोरे (वय ४५, रा. आस्टूल) घटनास्थळावरून पळून गेला.

या दरम्यान आरोपीने “मी तुला सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपीकडून धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.  महिलेच्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी आरोपी संजय मोरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 74, बी.एन.एस. कलम 351 (2) नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top