Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Constitution Day: सस्ती येथे संविधान दिनानिमित्त साकारली भव्य रांगोळी

Constitution Day: संविधान दिनाच्या निमित्ताने अकोला जिल्हा कलाध्यापक संघ, अकोला आणि आनंद बुद्ध विहार, सस्ती (ता. पातूर) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान अर्पण करतानाच्या दृश्यावर आधारित भव्य रांगोळी साकारण्यात आली. ही आकर्षक आणि कलात्मक रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Constitution Day

दिग्रस बू : संविधान दिनाच्या निमित्ताने अकोला जिल्हा कलाध्यापक संघ, अकोला आणि आनंद बुद्ध विहार, सस्ती (ता. पातूर) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान अर्पण करतानाच्या दृश्यावर आधारित भव्य रांगोळी साकारण्यात आली. ही आकर्षक आणि कलात्मक रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क, न्याय, स्वातंत्र्य आणि समतेची हमी देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासपूर्वक आणि सर्वसमावेशक विचारातून घडवलेले हे पवित्र दस्तावेज आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. संविधान दिन हा त्या मौलिक विचारांच्या स्मरण, जतन आणि पालनाचा संदेश देणारा दिवस असून त्याच भावनेचे प्रभावी कलात्मक दर्शन या रांगोळीतून घडले.

 या रांगोळीचा आकार : १० फूट × १५ फूट होता तर रांगोळी साकारण्यासाठी 8 तास लागले. रांगोळीसाठी साहित्य : १२० किलो रंगीत रांगोळी लागली. या कलाकृतीची भव्यता, विषयातील सामाजिक जाण आणि बारकाईची सूक्ष्मता यामुळे ही रांगोळी पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनली आहे.

 अकोला जिल्हा कलाध्यापक संघातील कलाशिक्षक संजय आगाशे, सुभाष धार्मिक, संदीप शेवलकर, चंद्रकांत वाघ, महेंद्र कोकणे, संजय गोपनारायण, संजय तायडे, हेमंत उपरीकर, संतोष सहारे, चंदन गोपनारायण, हनुमंत चव्हाण, आनंद फुलारी, विवेक फोकमारे या सर्वांनी एकत्रितपणे ही रांगोळी साकारण्यासाठी मनापासून परिश्रम घेतले.

 कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आनंद बुद्ध विहार सस्ती येथील जे. एन. अंभोंरे, दादाराव अंभोंरे, बाबुराव गाडेकर, दिलीप अंभोंरे, मोहन अंभोंरे, गजानन अंभोंरे, जगन्नाथ अंभोंरे आणि सुरज अंभोंरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  संजय श्रीहरी अंभोंरे, राजेश जगदेव अंभोंरे, सुनील सदानंद तायडे, संजय राजाराम गोपनारायण यांच्या विशेष आणि आर्थिक सहकार्यामुळे हा उपक्रम भव्य आणि अत्यंत दर्जेदार पद्धतीने पार पडला. तसेच महिला उपासीका संघ आणि भीमशक्ती मंडळ यांच्या योगदानामुळे कार्यक्रमाला अधिक व्यापकता प्राप्त झाली. याआधीदेखील अकोला जिल्हा कलाध्यापक संघाने सामाजिक जागरूकतेसाठी भव्य रांगोळीद्वारे अनेक उपक्रम राबविले असून, यंदाची संविधान दिनानिमित्त साकारलेली रांगोळी या परंपरेचे प्रभावी पुढे नेणारे उदाहरण ठरले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top