Mahabreaking

[breaking_news]

parents lock down school :दोन शिक्षकांवर सात वर्गांचा भार; संतप्त पालकांनी ठोकले शाळेला कुलूप

parents lock down school : पातूर पंचायत समितीअंतर्गत खेट्री येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी असल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन छेडले. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची पालकांची तीव्र नाराजी या आंदोलनातून व्यक्त झाली.

parents lock down school

खेट्री येथील जिल्हा परिषद शाळेतील चित्र : शिक्षकांची तातडीने नियुक्त करण्याची मागणी

राहुल सोनोने

दिग्रस (बू) : पातूर पंचायत समितीअंतर्गत खेट्री येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी असल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन छेडले. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची पालकांची तीव्र नाराजी या आंदोलनातून व्यक्त झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत सत्र सुरू होण्यापूर्वी पाच शिक्षक कार्यरत होते. त्यातील चार शिक्षकांची बदली झाल्यानंतर केवळ दोन नवीन शिक्षकांची नियुक्ती झाली. तिघे शिक्षक कार्यरत असताना त्यापैकी एक शिक्षक गेल्या काही महिन्यांपासून आजारी रजेवर असल्याने प्रत्यक्षात फक्त दोनच शिक्षकांवर वर्गांचे ओझे आले आहे. वर्ग ७ पर्यंतची मोठी पटसंख्या असलेल्या शाळेत दोन शिक्षकांवर सर्व भार पडत असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे कठीण झाले आहे, असा पालकांचा आरोप आहे.

याबाबत अनेकदा लेखी तक्रारी देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पालक संतप्त झाले आणि मंगळवारी शाळेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांनी घटनास्थळी धाव घेत पालकांशी चर्चा करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तात्पुरता शिक्षक देण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश मिळताच नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. संध्याकाळी पाचच्या सुमारास पालकांनी हे आश्वासन मान्य करून शाळेचे कुलूप उघडले आणि आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिली.

यावेळी शाळा समिती अध्यक्ष राष्ट्रपाल तिडके, संदीप लांडे, प्रमोद तिडके, सिद्धार्थ वानखडे, अविनाश पजई, कैलास मेसरे, नितीश तिडके, विजू मोरे, जितेश तिडके, दत्ता ताले, दिनेश तिडके, अजिंक्य गावंडे, श्रीकृष्ण अडकणे आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पटसंख्यानुसार तीन शिक्षक असायला हवेत. एक शिक्षक आजारी रजेवर असल्याने तात्पुरता पर्यायी शिक्षक देण्याची प्रक्रिया सुरू आहे,
मो. आरिफ, केंद्रप्रमुख पिंपळखुटा केंद्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top