Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Arrears reach Rs 630 crore : थकबाकी ६३० कोटी रुपयांवर पोहचली; महावितरणतर्फे धडक वीजबिल वसूली मोहीम

Arrears reach Rs 630 crore : वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली आहे. परिमंडळाअंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील वीज बिलाची थकबाकी ६३० कोटीवर पोहचली आहे. वीजबिल भरा नाहीतर कारवाईला सामोरे जा असा नाईलाजास्तव महावितरणने पवित्रा घेतला असून कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे,असे आवाहन महावितरणने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 2 लाख 35 हजार 241 ग्राहकांकडे 349 कोटी 74 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महावितरणनेने विशेष मोहिम सुरू केली आहे.

Mahavitaran launches
वीज बिल भरून सहकार्य करा ; राजेश नाईक

बुलडाणा : वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली आहे. परिमंडळाअंतर्गत अकोला,बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील वीज बिलाची थकबाकी ६३० कोटीवर पोहचली आहे. वीजबिल भरा नाहीतर कारवाईला सामोरे जा असा नाईलाजास्तव महावितरणने पवित्रा घेतला असून कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे,असे आवाहन महावितरणने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 2 लाख 35 हजार 241 ग्राहकांकडे 349 कोटी 74 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महावितरणनेने विशेष मोहिम सुरू केली आहे.
परिमंडळात लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा व इतर वर्गवारीतील एकूण ०५ लाख ५ हजार ८२२ ग्राहकांकडे ६३० कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती वर्गवारीतील ४ लाख ५७ हजार ६९९ ग्राहकांकडे १६६ कोटी ९१ लाख रूपये थकीत आहेत. व्यावसायिक वर्गवारीतील २८ हजार ३७४ ग्राहकांकडे १९ कोटी १५ लाख, औद्योगिक वर्गवारीतील ५ हजार ५२१ ग्राहकांकडे २४ कोटी ८० लाख, पथदिवे वर्गवारीतील ४ हजार १०६ ग्राहकांकडे २७३ कोटी , सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीतील २६३२ ग्राहकांकडे १३६ कोटी ५३ लाख व इतर वर्गवारीतील ७ हजार ४९० ग्राहकांकडे १० कोटी ५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
मुख्य अभियंता राजेश नाईक वीजबिल वसूली मोहीमेत सहभागी झाले असून उपविभाग निहाय तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या बैठका आयोजित करून प्रत्येक कर्मचाऱ्यांना वसूलीचे उद्धीष्ठ देत आहेत.तसेच अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी या मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुली करीत आहेत.
अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत. परंतू जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे. तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या स्पष्ट सुचनाही देण्यात आल्या आहेत.

डिस्कनेक्शनचा मन:स्ताप व रिकनेक्शनचा भुर्दंड टाळा
महावितरणने आपले वीज कनेक्शन तोडण्याची वाट न पाहता ग्राहकांनी चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकीची रक्कम विनाविलंब भरून सहकार्य करावे. थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास बिलाच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी ३१० रुपये तर थ्री फेजजोडणीसाठी ५२० रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top