Constitution Day celebrated : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेल्या भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने, तसेच संविधानाचे महत्त्व, समाजवादी-धर्मनिरपेक्ष लोकशाही, सर्वधर्मसमभाव, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतर मूल्यमूल्यांचे प्रतिबिंब जनमानसात दृढ करण्याच्या हेतूने भाऊसाहेब बिडकर विद्यालय, अनभोरा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रम, संविधानावर आधारित एकांकिका, गीतगायन व वकृत्व स्पर्धा आयोजित : प्रभातफेरीत घुमला संविधानाचा जागर
बोरगाव मंजू : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेल्या भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने, तसेच संविधानाचे महत्त्व, समाजवादी-धर्मनिरपेक्ष लोकशाही, सर्वधर्मसमभाव, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतर मूल्यमूल्यांचे प्रतिबिंब जनमानसात दृढ करण्याच्या हेतूने भाऊसाहेब बिडकर विद्यालय, अनभोरा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी गावच्या मुख्य मार्गावरून प्रभातफेरी काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विविध महापुरुषांच्या जयघोषात संविधानाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. तसेच गावातील चावडीसह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित एकांकिका सादर करत न्याय, हक्क, समानतेचा अधिकार यांसारख्या संविधानातील महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला.
संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात मुख्याध्यापक विजय इंगळे, शिक्षक मधुसूदन ढोरे, शिक्षक संजय गावंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विजय इंगळे होते. प्रमुख उपस्थितींत शिक्षक संजय तायडे, किरण इंगळे, रामदास धुळे, संजय गावंडे, मनोज बाईस्कर, प्रमोद म्हैसने, सुनील चव्हाण यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

