Deputy Chief Minister Ajitdada Pawar: नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे २६ नोव्हेंबर रोजी देऊळगाव राजा येथे जाहीर सभा घेणार आहेत. देऊळगाव राजा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधुरी तुषार शिपणे आणि सिंदखेड राजा नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्याम किसनराव मेहेत्रे यांच्यासह सदस्यपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले चौक (कमेटी चौक) येथे सायंकाळी ५ वाजता जनसमुदायाला संबोधित करतील.

देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि चिखली नगरपालिकांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा
देऊळगाव राजा : नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे २६ नोव्हेंबर रोजी देऊळगाव राजा येथे जाहीर सभा घेणार आहेत. देऊळगाव राजा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधुरी तुषार शिपणे आणि सिंदखेड राजा नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्याम किसनराव मेहेत्रे यांच्यासह सदस्यपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले चौक (कमेटी चौक) येथे सायंकाळी ५ वाजता जनसमुदायाला संबोधित करतील.
तत्पूर्वी, ते चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युतीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार प्रा. डॉ. निलेश गावंडे यांच्यासह सदस्यपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दुपारी ४ वाजता जाहीर सभा घेणार आहेत.
स्थानिक राजकीय समीकरणांचा आढावा, उमेदवारांशी चर्चा आणि विद्यमान परिस्थितीचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी अजितदादांचा हा दौरा अत्यंत निर्णायक मानला जात आहे. मतदारसंघातील तरुण व उत्साही नेतृत्व म्हणून आमदार मनोज कायंदे यांच्यासाठीदेखील या निवडणुकीत प्रथमच मोठ्या प्रमाणावर नगरपालिकांच्या लढतींच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.नव्या राजकीय पिढीचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा हा पहिलाच व्यापक निवडणूक अनुभव असल्याने, निवडणूक रणनीती, पक्ष संघटना बळकट करणे आणि स्थानिक पातळीवरील समन्वय अशा विविध बाबींवर अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे राकॉ अजित पवार गटाच्या उमेदवारांना मोठे बळ मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

