Devansh Shewale: डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा संकुल, ललपुर–वाराणसी येथे 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या प्रतिष्ठित राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत ‘सर्वोत्तम राज्य’ हा बहुमान पटकावला. या यशामध्ये चिमुकल्या देवांश योगेश शेवाळे (वय 11.6 वर्षे) याने लक्षणीय योगदान देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देवांश हा १४ वर्षाखालील गटातील सर्वात लहान स्पर्धक असून त्याने खालील उल्लेखनीय यश मिळवले.

महाराष्ट्राला ‘सर्वोत्तम राज्य’ पुरस्कार मिळवून देण्यात उचलला मोलाचा वाटा
बुलढाणा : डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा संकुल, ललपुर–वाराणसी येथे 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या प्रतिष्ठित राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत ‘सर्वोत्तम राज्य’ हा बहुमान पटकावला. या यशामध्ये चिमुकल्या देवांश योगेश शेवाळे (वय 11.6 वर्षे) याने लक्षणीय योगदान देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देवांश हा १४ वर्षाखालील गटातील सर्वात लहान स्पर्धक असून त्याने खालील उल्लेखनीय यश मिळवले.

देवांशने
- टीम इव्हेंटमध्ये सुवर्णपदक (Gold Medal)
- व्यक्तिगत कामगिरीत संपूर्ण भारतात चौथा क्रमांक (All India Rank 4)
- एलीमिनेशन राऊंडमध्ये टॉप 16 मध्ये प्रवेश
आदी यश मिळवले. या स्पर्धेत देशभरातील २८ राज्ये, ६ केंद्रशासित प्रदेश आणि ६ विविध बोर्डांमधील एकूण १२०० स्पर्धक सहभागी झाले होते. या प्रबळ स्पर्धेत देवांशने उत्कृष्ट तंत्र आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उत्तम कामगिरी सादर केली. देवांशचे मार्गदर्शक आणि कोच चंद्रकांत इलग सर हे त्याला उत्तम प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवांशने मिळवलेले हे यश राज्यासाठी अभिमानाचा विषय बनले आहे. या भव्य राष्ट्रीय स्पर्धेत देवांश शेवाळे याने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.

