Milind Wankhade : भारतीय नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचे मूलभूत अधिकार बहाल करणाऱ्या भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ, संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “भारताचे संविधान हाच आमचा अभिमान” या ब्रीदवाक्याखाली २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर (मुंबई) येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुलढाणा : भारतीय नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचे मूलभूत अधिकार बहाल करणाऱ्या भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ, संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “भारताचे संविधान हाच आमचा अभिमान” या ब्रीदवाक्याखाली २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर (मुंबई) येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक सभेला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच देशभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, विविध जाती-समूह आणि बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा या महासभेचा उद्देश आहे.
प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार बुलढाणा शहरातील सर्व बहुजनवादी, लोकशाहीवादी तसेच संविधानाचा आदर करणाऱ्या सर्व जातीधर्मातील नागरीकांनी हजारोंच्या संख्येने या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा शहराध्यक्ष मिलिंद वानखेडे यांनी केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “ही सभा ऐतिहासिक ठरणार असून आपण सर्वांनी तिचे साक्षीदार व्हावे. संविधानाचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा.”

