Strong performance of players :क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्हा शालेय थाई बॉक्सिंग स्पर्धा क्रीडा संकुल, मुर्तिजापूर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम खेळ कौशल्य सादर करत चमकदार कामगिरी बजावली असून अनेक खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मुर्तिजापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्हा शालेय थाई बॉक्सिंग स्पर्धा क्रीडा संकुल, मुर्तिजापूर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम खेळ कौशल्य सादर करत चमकदार कामगिरी बजावली असून अनेक खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट आणि तालुका क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा संयोजक विनोद काळपांडे होते. अमरावती विभागीय थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष गंगाधर जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचा शुभारंभ झाला.या वेळी क्रीडा संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ताले, क्रीडा पंच संजय तायडे गुरुजी, संतोष भांडे, जितेंद्र चौबे, विलास वानखेडे, वैभव मालठाणे, अक्षय भागवत, समीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत उत्तम प्रदर्शन करून विभागीय स्तरावर निवडलेले विद्यार्थी :
मुले : अभिषेक जाधव, अनभोरा, संतोष जाधव, आर्यन शोलेकार, मिलिंद जामनिक, लावार्त शेंडे, अंकुश कनोजे, अर्जुन रियांश, सचिन तांबडे, दिनेश राऊत, अंशुमन सरोदे, यश पवार, मयंक चरण जाधव, आयुष करूण्ये, आशिष मोहिते, नैतिक चक्रे, क्षितीज पालीवाल, देवांश मोटवानी, आदित्य बोळे, अनय जळमकर.
मुली : प्रिया जाधव, दिव्या थोरात, राणी जाधव, खुशी मेटे, श्रावणी पंडित, पूनम सिरसाठ, नंदिनी वरोकार, अक्षरा ठाकरे, मधुरा लोढम.
या सर्व निवडलेल्या खेळाडूंचा विभागीय स्तरावरील थाई बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग ३ डिसेंबर रोजी होणार आहे. अकोला जिल्ह्यातील या तरुण खेळाडूंमुळे विभागीय पातळीवर पदकांची आशा अधिक बळावली आहे.

