Mahabreaking

🔴 BREAKING
As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास

speeding two-wheelers: भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार, एक गंभीर

speeding two-wheelers: भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक युवक ठार तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना लव्हाळा ते साखरखेर्डा रोडवर मोहाडी फाट्या जवळ 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास घडली . गणेश विश्वनाथ मते (वय 28,रा. देऊळगाव माळी) असे मृतकाचे नाव आहे.

speeding two-wheelers:
साखरखेर्डा ते लव्हाळा रस्त्यावरील घटना : मृतक देऊळगाव माळी येथील

साखरखेर्डा : भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक युवक ठार तर एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना लव्हाळा ते साखरखेर्डा रोडवर मोहाडी फाट्या जवळ 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास घडली . गणेश विश्वनाथ मते (वय 28,रा. देऊळगाव माळी) असे मृतकाचे नाव आहे.
देऊळगाव माळी येथील गणेश विश्वनाथ मते हा युवक आपल्या पलसर क्र एमएच १८ सीडी ६११६ दुचाकीने लव्हाळा कडून साखरखेर्डा येथे जात होता. तसेच सवडद येथील कारपेंटर अनिल कचरू खोलगाडगे वय ३० हा साखरखेर्डा येथून आपली दुचाकी एच एफ डिलक्सने क्र एममहा ३७ – ९८४७ ने सवडद आपल्या गावी जात होता . मोहाडी फाट्यानजीक उतारात दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही युवक गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने काही नागरिकांनी साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले . साखरखेर्डा येथे प्राथमिक उपचार करून तातडीने चिखली येथील खासगी रुग्णालयात हलवले असता यापैकी गणेश याला डॉक्टरांनी मृत घोषित केले . तर अनिल खोलगाडगे त्याचेवर उपचार सुरू आहेत . गणेश मते हा मेहकर येथे गाभणे हॉस्पिटलमधे कम्पाउंडर म्हणून नोकरीला होता . दिवसभर देऊळगाव माळी येथे पानठेला चालवून तो रात्री मेहेकर येथे नोकरी करत होता . दरम्यान ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही दुचाकीचा पंचनामा करून वाहने ताब्यात घेतली आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top