Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Tight security: कडेकोट सुरक्षा! देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणुकीपूर्वी पोलिस अधीक्षक यांनी केली स्ट्रॉंग रूमची पाहणी

Tight security: नगरपरिषद निवडणुकांच्या पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी देऊळगाव राजा येथे स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रत्यक्ष पाहणी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा तपशीलवार आढावा घेतला.

Tight security
देऊळगाव राजा : नगरपरिषद निवडणुकांच्या पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी देऊळगाव राजा येथे स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रत्यक्ष पाहणी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा तपशीलवार आढावा घेतला.

त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेची सखोल तपासणी
पाहणीवेळी स्ट्रॉंग रूम परिसरातील खालील बाबींची काटेकोर तपासणी करण्यात आली.
त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, तैनात पोलीस बंदोबस्त, प्रवेश नियंत्रण नोंदवही, 24×7 CCTV निरीक्षण प्रणाली, सतत दक्ष असणारे सुरक्षा पथक तसेच परिसरातील फायर सेफ्टी, बॅरिकेटिंग, प्रकाशव्यवस्था, आणि निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या संवेदनशील साहित्याच्या सुरक्षेचीही पाहणी करण्यात आली.

“सुरक्षा शिस्त काटेकोर पाळा” – पोलीस अधीक्षकांचा निर्देश
पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा आणि शिस्तीचे पालन करण्याचे निर्देश दिले.
तसेच, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला देण्यात आले.

सुरक्षा व्यवस्था समाधानकारक

पाहणीनंतर सुरक्षा व्यवस्था समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले. आगामी निवडणुकांदरम्यान कुठलीही सुरक्षाविषयक तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासनही पोलीस विभागाने दिले. या पाहणीदरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, ब्रह्मगिरी पोलीस निरीक्षक देऊळगाव राजा, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी तसेच नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top