Mahabreaking

🔴 BREAKING
Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’ Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’

 rebellion be contained : बंडखोरांचे बंड शमेल काय? वरिष्ठांची मनधरणी सुरू; २१ नोव्हेंबरला चित्र होणार स्पष्ट

rebellion be contained : नगरपालिका निवडणुका जाहीर होताच देऊळगाव राजा शहरातील राजकीय तापमान चढू लागले आहे. सर्वच प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरीचे ग्रहण पडत असून वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न अद्याप पूर्णपणे यशस्वी ठरताना दिसत नाहीत. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी — 21 नोव्हेंबरला — कोण पक्षनिष्ठा जपतो आणि कोण राजकीय समीकरणे बदलतो, हे स्पष्ट होणार आहे.

rebellion be contained?

देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक : सर्व पक्षांत बंडखोरीचे वादळ!

गजानन तिडके
देऊळगाव राजा :नगरपालिका निवडणुका जाहीर होताच देऊळगाव राजा शहरातील राजकीय तापमान चढू लागले आहे. सर्वच प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरीचे ग्रहण पडत असून वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न अद्याप पूर्णपणे यशस्वी ठरताना दिसत नाहीत. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी — 21 नोव्हेंबरला — कोण पक्षनिष्ठा जपतो आणि कोण राजकीय समीकरणे बदलतो, हे स्पष्ट होणार आहे.

इच्छुकांची स्वप्ने चकनाचूर, बंडाचा मार्ग स्वीकारला
गेल्या सात-साडेसात वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा होती. निवडणुका जाहीर होताच नगराध्यक्ष तसेच प्रभागनिहाय उमेदवारीवर अनेकांनी दावे केले.
एकाच पक्षातून 4 ते 5, तर काही ठिकाणी 7-8 जणांनी पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.
मात्र अंतिम क्षणी पक्षांनी इतर उमेदवारांवर शिक्कामोर्तब केल्याने इच्छुकांच्या नाराजीचा स्फोट झाला. ज्यांनी महिनोंमहिने मैदान गाजवले, त्यांनीच बंडाची मशाल पेटवून स्वतःचे अर्ज कायम ठेवले.
यामुळे सर्वच पक्षांना मोठ्या पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे.

अनैसर्गिक आघाड्यांची राजकारणात नवी समीकरणे
शहराच्या विकासाच्या नावाखाली काही अनपेक्षित आघाड्या निर्माण झाल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) + शिवसेना (शिंदे गट),
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) + भाजपा, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) + काँग्रेस यांचा यामध्ये समावेश आहे. राजकीय विरोधात सातत्याने एकमेकांवर टीका करणारे नेते आज एकाच मंचावर दिसू लागल्याने शहरात चर्चा रंगल्या आहेत. परंतु, या आघाड्यांनाही स्वकीय बंडखोरांमुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मतदारांना विविध ‘आमिषे’ दाखवण्याची स्पर्धा
निवडणूक आली की मतदार राजा केंद्रस्थानी येतो. विकासाचे आश्वासन, आर्थिक आकर्षणे, हक्कांचे आमिष, सांस्कृतिक कार्यक्रम —विविध प्रकारच्या आमिषांची आताच चर्चा सुरू आहे.
परंतु मतदार हे आमिषांना भुलतात की उमेदवारांच्या कार्यशैलीला महत्त्व देतात, हे 2 डिसेंबरच्या मतदानातून स्पष्ट होणार आहे.

अर्ज छाननी : कोण पात्र, कोण अपात्र?

अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी असा कल दिसला.

नगराध्यक्ष पदासाठी १५ अर्ज पात्र
एकूण अर्ज : 23
अपात्र : 8
पात्र : 15
नगरसेवक पद (एकूण 21 जागा)
अर्ज दाखल : 168
अपात्र : 9
पात्र : 159

अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी थोरात, सहाय्यक निर्णय अधिकारी वैशाली डोंगरजाळ आणि टीम यांनी केली.

बंडखोर मागे हटतील का? हाच खरा प्रश्न
२१ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. त्यामुळे आता एकच चर्चा “कोणता पक्ष किती बंडखोरांना आवर घालतो?” आणि “कोण खऱ्या अर्थाने पक्षनिष्ठा सिद्ध करतो?”
या सर्व राजकीय गोंधळात खरे चित्र 21 नोव्हेंबरला आणि अंतिम निकाल 2 डिसेंबरनंतर समोर येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top