MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्यांच्या आर्थिक घडीला बळकटी मिळते. आजही नगदी पिकामधील कापूस हे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पिक मानले जाते. मात्र यंदाच्या खरिपात सोयाबीन व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला आधार देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी सांगितले.

बोरगाव मंजू येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ
संजय तायडे
बोरगाव मंजू : शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्यांच्या आर्थिक घडीला बळकटी मिळते. आजही नगदी पिकामधील कापूस हे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पिक मानले जाते. मात्र यंदाच्या खरिपात सोयाबीन व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला आधार देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी सांगितले.
बोरगाव मंजू येथील अजमेरा जीनिंग फॅक्टरीमध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अनुप भाऊ धोत्रे होते. उद्घाटन आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते करून खरेदी प्रक्रियेचा प्रारंभ झाला.
खासदार अनुप भाऊ धोत्रे म्हणाले की, बोरगाव मंजू येथील कापूस खरेदी केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. पारदर्शक खरेदी प्रक्रिया, योग्य हमीभाव आणि विक्री नंतर वेळेवर पैसे जमा करण्याची हमी देत, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे त्यांनी आश्वासन दिले.

कार्यक्रमाला सीसीआय केंद्रप्रमुख अमित कोल्हे, संचालक प्रकाश काळे, जीनिंग संचालक ललित अजमेरा, भाजपा तालुका सरचिटणीस व माजी सरपंच जयकृष्ण ठोकळ पाटील, संजय गावंडे, दिनेश काळे, योगेश गोतमारे, सुबोध गवई, बंटी मांगे, गजानन बरडे, पंकज वाडेवाले आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
जीनिंग संचालक ललित अजमेरा यांनी सांगितले की केंद्रावर ८ ते १२ टक्के आर्द्रता असलेल्या कोरड्या कापसाची ५.५ ते १२ क्विंटलपर्यंत खरेदी ३१ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.प्रास्ताविकात डॉ. योगेश अजमेरा यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या समस्यांवर वेळेवर उपाय करून त्यांच्या सशक्त भविष्यासाठी खरेदी केंद्रावर विशेष लक्ष दिले जाईल. कार्यक्रमाचे आभार गजानन बरडे यांनी मानले.

