Mahabreaking

[breaking_news]

Aadhaar services :आधारसाठी नागरिकांची धावपळ थांबणार! बाळापूर तहसील कार्यालयात नवीन आधार केंद्र सुरू

Aadhaar services : आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. शासकीय योजनांचा लाभ, विविध प्रशासकीय कामे, बँकिंग व्यवहार तसेच इतर महत्त्वाच्या सेवांसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने नवीन नोंदणी, दुरुस्ती आणि अद्ययावतीकरणासाठी नागरिकांना आधार केंद्रांवर जावे लागते. मात्र, बाळापूर शहरासह तालुक्यातील विविध आधार केंद्रांवर वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. अनेकदा कामे रखडत असल्याने नागरिकांना वेळ आणि पैसा खर्च करून इतरत्र फेऱ्या माराव्या लागत होत्या.

Aadhaar services

बाळापूरकरांना मोठा दिलासा; तहसील कार्यालयातच मिळणार आधार नोंदणी व दुरुस्तीची सुविधा

बाळापूर : आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. शासकीय योजनांचा लाभ, विविध प्रशासकीय कामे, बँकिंग व्यवहार तसेच इतर महत्त्वाच्या सेवांसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने नवीन नोंदणी, दुरुस्ती आणि अद्ययावतीकरणासाठी नागरिकांना आधार केंद्रांवर जावे लागते. मात्र, बाळापूर शहरासह तालुक्यातील विविध आधार केंद्रांवर वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. अनेकदा कामे रखडत असल्याने नागरिकांना वेळ आणि पैसा खर्च करून इतरत्र फेऱ्या माराव्या लागत होत्या.

नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा माहिती केंद्रामार्फत केंद्र शासनाकडे अतिरिक्त आधार केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला प्रतिसाद देत अकोला जिल्ह्यात १८ अतिरिक्त आधार केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्या आदेशान्वये २४ नोव्हेंबर रोजी बाळापूर तहसील कार्यालयात नवीन आधार केंद्र सुरू करण्यात आले.

या नवीन आधार केंद्राचे उद्घाटन नायब तहसीलदार कौतुकराव रावळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार निंबोकार, विजयआनंद जाधव, संजय गांधी योजना विभागाचे कनिष्ठ लिपिक संजय जाधव यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

आता आधारसाठी इतरत्र जाण्याची गरज कमी होणार!

तहसील कार्यालयातच आधार केंद्राची सुविधा उपलब्ध झाल्याने नवीन आधार नोंदणी, आधार कार्डमधील दुरुस्ती आणि आवश्यक अद्ययावतीकरणाची कामे करणे नागरिकांना अधिक सोयीचे होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची होणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रशासनाच्या या निर्णयामुळे बाळापूर तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या केंद्रावर नियमित सेवा, पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक तांत्रिक सुविधा अखंडित उपलब्ध राहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांना आधारविषयक कामांसाठी वेळेत आणि सुलभपणे सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top