Tragedy strikes : रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देऊळगाव राजा येथे घडली. पवन अंबादास इंगळे (वय २२, रा. वरुड, ता. जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयासमोर हा अपघात झाला. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पेट्रोल भरून परतताना काळाने गाठले; देऊळगाव राजात अपघातात जालन्याचा तरुण ठार
गजानन तिडके
देऊळगाव राजा : रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देऊळगाव राजा येथे घडली. पवन अंबादास इंगळे (वय २२, रा. वरुड, ता. जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयासमोर हा अपघात झाला. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन इंगळे हा ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री स्कुटी क्रमांक एमएच २८ बीझेड ०३४६ ने उंबरखेड फाट्याकडून पेट्रोल भरून देऊळगाव राजा येथे येत होता. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयासमोर अचानक गाय रस्त्यावर आडवी आली. त्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन पवन रस्त्यावर पडला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या पवनचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्याचे वडील अंबादास दिगंबर इंगळे (वय ४४, व्यवसाय शेती, रा. वरुड, पोस्ट नाव्हा, ता. जि. जालना) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तोंडी फिर्याद दिली.
विशेष म्हणजे, अपघाताची घटना ६ नोव्हेंबर रोजी घडली असताना यासंदर्भातील नोंद २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.२० वाजता देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी कायम मर्ग क्रमांक ५१/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अन्वये नोंद केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दाखल अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर सानप यांनी कार्यवाही केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर हा वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर प्रश्न बनत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

