Mahabreaking

[breaking_news]

Illegal sex-determination :शेतातील गोठ्यात गर्भलिंग तपासणीचा काळा धंदा!  बोगस डॉक्टरसह तिघे पीसीपीएनडीटीच्या जाळ्यात 

Illegal sex-determination : मुलगा-मुलगी असा भेदभाव करून स्त्रीभ्रूण हत्येला खतपाणी घालणाऱ्या अवैध गर्भलिंग निदानाच्या प्रकाराविरुद्ध आरोग्य प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अमडापूर–लवाळा मार्गावरील एका शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून अवैधरीत्या गर्भलिंग तपासणी सुरू असल्याचे उघडकीस आले. अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी विभागाच्या संयुक्त पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून बोगस डॉक्टर, वाशिम येथील एजंट आणि त्यांना मदत करणाऱ्या अन्य एका व्यक्तीला रंगेहात पकडले. या कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह तपासणीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, तिन्ही आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal sex

 सकाळी ६ पासून पाठलाग, दुपारी २ वाजता धाड! अमडापूर–लवाळा रोडवर अवैध सोनोग्राफीचा पर्दाफाश

गजानन तिडके 

बुलढाणा : मुलगा-मुलगी असा भेदभाव करून स्त्रीभ्रूण हत्येला खतपाणी घालणाऱ्या अवैध गर्भलिंग निदानाच्या प्रकाराविरुद्ध आरोग्य प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अमडापूर–लवाळा मार्गावरील एका शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून अवैधरीत्या गर्भलिंग तपासणी सुरू असल्याचे उघडकीस आले. अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी विभागाच्या संयुक्त पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून बोगस डॉक्टर, वाशिम येथील एजंट आणि त्यांना मदत करणाऱ्या अन्य एका व्यक्तीला रंगेहात पकडले. या कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह तपासणीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, तिन्ही आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal sex

गुप्त माहितीच्या आधारे डिकॉय ऑपरेशन

संबंधित बोगस डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अवैध गर्भलिंग निदान करत असल्याची गोपनीय माहिती अकोला येथील उपसंचालक कार्यालयाच्या पीसीपीएनडीटी विभागाला मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसंचालक डॉ. आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डिकॉय (बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा) ऑपरेशनचे नियोजन करण्यात आले.

Illegal sex

दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून अकोला विभागीय पीसीपीएनडीटी पथकाने संशयित बोगस डॉक्टरचा माग काढण्यास सुरुवात केली. वाशिम येथून त्याचा पाठलाग करण्यात येत होता. अखेर हा संशयित अमडापूर–लवाळा मार्गावरील गणेश शंकरराव सूर्यवंशी यांच्या शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोहोचला. तेथे डिकॉय ऑपरेशनच्या माध्यमातून सोनोग्राफी तपासणी सुरू करण्यात आली.

Illegal sex

संबंधित ठिकाणी अवैध तपासणी सुरू असल्याची खात्री होताच दबा धरून असलेल्या संयुक्त पथकाने दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकली. यावेळी बोगस डॉक्टर, वाशिम येथील एजंट आणि त्याला मदत करणाऱ्या अन्य एका व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले. ग्रामीण भागातील शेतातील पत्र्याच्या गोठ्यात अशा प्रकारे अवैध गर्भलिंग तपासणी सुरू असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सोनोग्राफी मशीनसह साहित्य जप्त; सहा वाजता गुन्हा दाखल

या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तपासणीसाठी वापरण्यात येणारे संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी ६ वाजता तिन्ही आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय, चिखलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमर सय्यद यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली.

तीन जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणेची संयुक्त मोहीम

ही कारवाई अकोला मंडळाच्या उपसंचालक डॉ. आरती कुलवाल, बुलढाणा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि वाशिमचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत अकोला विभागीय पथकाचे डॉ. अनुप चौधरी, डॉ. सोनाली तायडे, ॲड. शुभांगी ठाकरे (विधी समुपदेशक), श्रीमती किरण जाणूनकर (स्टाफ नर्स, पीसीपीएनडीटी विभागीय पथक अकोला), डॉ. राहुल डोंगरे, ॲड. राधा नरवलिया (विधी समुपदेशक, पीसीपीएनडीटी विभाग वाशिम), ॲड. वंदना काकडे (विधी समुपदेशक, जिल्हा रुग्णालय बुलढाणा), डॉ. उमेश सावजी (स्त्रीरोगतज्ज्ञ, उपजिल्हा रुग्णालय चिखली) आणि श्री. ज्ञानेश्वर मुळे (पीसीपीएनडीटी विभाग बुलढाणा) यांनी सहभाग घेतला.

या मोहिमेसाठी वाशिम स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी पीसी संतोष वाघ, एलपीसी तेजस्विनी खोडके आणि डीपीसी सुनील तायडे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच अमडापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

अकोला परिमंडळात २०२६-२७ मधील चौथी कारवाई

अवैध गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी अकोला परिमंडळातील पीसीपीएनडीटी विभागीय पथक सक्रियपणे काम करत आहे. विशेष म्हणजे, अकोला परिमंडळ हे विभागीय पीसीपीएनडीटी पथक कार्यरत असलेले एकमेव परिमंडळ असल्याची माहिती देण्यात आली आहे. सन २०१७ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे या विभागीय पथकाने पहिली कारवाई केली होती. त्यानंतर अशा अवैध प्रकारांविरुद्ध सातत्याने कारवाई केली जात आहे. २०२६-२७ या वर्षातील ही पथकाची चौथी यशस्वी कारवाई असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

गर्भलिंग निदान करणाऱ्यांना प्रशासनाचा इशारा

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा अर्थात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गर्भलिंग निदान करणे, गर्भलिंग सांगणे किंवा अशा बेकायदेशीर कृत्याला मदत करणे हा दंडनीय अपराध आहे. मुलगा-मुलगी समानता, स्त्रीभ्रूण हत्या रोखणे आणि मुलींच्या जन्माचा सन्मान राखणे हा या कायद्यामागील प्रमुख उद्देश आहे.

शेतातील गोठ्यापासून ग्रामीण भागातील अन्य ठिकाणांपर्यंत पोहोचलेल्या या अवैध प्रकाराविरुद्ध तीन जिल्ह्यांच्या संयुक्त पथकाने केलेली कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top