two-wheeler hits Eicher truck: भरधाव आणि दुचाकीची धडक होऊन एक युवक जागीच ठार झाला.ही घटना बाळापूर–पातूर मार्गावरील देऊळगाव शिवारात मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता घडली.श्रीहरी दामोदर बर्डे (वय २४, रा. देऊळगाव) असे मृतक युवकाचे नाव आहे.

बाळापूर ते पातूर मार्गावरील देऊळगाव शिवारातील घटना
राहुल सोनोने
वाडेगाव : भरधाव आणि दुचाकीची धडक होऊन एक युवक जागीच ठार झाला.ही घटना बाळापूर–पातूर मार्गावरील देऊळगाव शिवारात मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता घडली.श्रीहरी दामोदर बर्डे (वय २४, रा. देऊळगाव) असे मृतक युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पातूर तालुक्यातील देऊळगाव येथील श्रीहरी दामोदर बरडे हा युवक दूध घेऊन मोटारसायकल (क्र. MH 30 BY 4537) वरून पातूरकडे येत होता. दरम्यान पातूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर वाहनाने (क्र. MP 09 DH 7932) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात श्रीहरी बरडे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर आयशरचा चालक व वाहक हे दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास पातूर पोलीस करत आहेत.

