Mahabreaking

[breaking_news]

Sickle cell disease :सिकलसेलने हिरावले १८ वर्षीय चैतालीचे आयुष्य; दिग्रस बु. गावावर शोककळा

Sickle cell disease : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील १८ वर्षीय विद्यार्थिनीचा सिकलसेल आजारामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १८ नोव्हेंबरच्या रात्री घडली. अल्पवयातच काळाने घाला घातल्याने गवई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Sickle cell

अवघ्या १८व्या वर्षी काळाचा घाला! सिकलसेल आजाराने विद्यार्थिनीचा मृत्यू

राहुल सोनोने

दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील १८ वर्षीय विद्यार्थिनीचा सिकलसेल आजारामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १८ नोव्हेंबरच्या रात्री घडली. अल्पवयातच काळाने घाला घातल्याने गवई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस बु. येथील चैताली देवेंद्र गवई (वय १८) ही सिकलसेल आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, तिची प्रकृती खालावली आणि तिला तीव्र तापही आला. उपचार सुरू असतानाही तिची प्रकृती नियंत्रणात न आल्याने १८ नोव्हेंबरच्या रात्री तिची प्राणज्योत मालवली.

अवघ्या १८व्या वर्षी चैतालीच्या झालेल्या निधनाने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या निधनाची बातमी समजताच गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, सर्वत्र शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top