Illegal sand: खडकपूर्णा नदीपात्र व परिसरातील वाढत्या अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कारवाई करत असतानाच विभागातील काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेमुळे रेतीतस्करीला चालना मिळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल विभागाने शनिवारी धडक कारवाई करत सुमारे सव्वा पाच लाख रुपये किमतीची अवैध रेती जप्त केली.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : खडकपूर्णा नदीपात्र व परिसरातील वाढत्या अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कारवाई करत असतानाच विभागातील काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेमुळे रेतीतस्करीला चालना मिळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल विभागाने शनिवारी धडक कारवाई करत सुमारे सव्वा पाच लाख रुपये किमतीची अवैध रेती जप्त केली.
सीनगाव–खल्याळगव्हाण रोडलगत खडकपूर्णा धरणाच्या काठावर मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठवून ठेवली असल्याची माहिती मिळताच तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी तात्काळ महसूल पथक घटनास्थळी पाठवले. पथकाने पाहणी केली असता धरणातून अवैधरित्या उपसलेली ३५० ब्रासपर्यंतची रेती आढळून आली.
महसूल पथकाने जेसीबीच्या साहाय्याने रेतीचा साठा ताब्यात घेतला. तसेच उपसा करण्यासाठी उभारलेली यंत्रसामग्री व स्ट्रक्चर पूर्णतः नष्ट करून पाण्यात फेकण्यात आली, तसेच तिन्ही उपसा केंद्रांभोवती जेसीबीने खोल चर खोदून सर्व केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली.
या कारवाईत मंडळ अधिकारी विजय हिरवे, ग्राम महसूल अधिकारी सुरेश डोईफोडे, संजय हांडे, सरिता वाघ आणि महसूल सेवक देशमाने यांनी सहभाग घेतला.
साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध ग्राम महसूल अधिकारी सुरेश डोईफोडे यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार बाळू उर्फ ज्ञानेश्वर मारुती नवले, भगवान उर्फ डिगांबर विष्णू वाघमारे आणि उमेश दिनकर मांटे (सर्व रा. सीनगाव जहांगीर) यांच्या विरोधात महाराष्ट्र गौण खनिज अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुढील तपास
तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत.

