Mahavitaran State Level Sports Competition :महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा: यजमान अमरावती,अकोला परिमंडळाला ८ सुवर्ण,६ रौप्य

अकोला : महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यजमान असलेल्या अमरावती–अकोला परिमंडळातील खेळाडूंनी सांघिक, जोडी आणि वैयक्तिक अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रभावी कामगिरी करत एकूण ८ सुवर्ण आणि ६ रजत पदकांची कमाई केली.
दिनांक १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे झालेल्या या स्पर्धेत २३ क्रीडा प्रकारात राज्यभरातून महावितरणचे ११६० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
ब्रीजमध्ये ऐतिहासिक सुवर्ण
ब्रीज क्रीडा प्रकारात प्रथमच अमरावती–अकोला परिमंडळाने सुवर्णाची मोहोर उमटवत सांघिक आणि जोडी क्रीडा प्रकारात वर्चस्व निर्माण केले.सांघिक ब्रीजमध्ये ब्रजेश गुप्ता, यज्ञेश क्षीरसागर, प्रमोद काबळे, विवेक मारोडे,अनुप पंडित,प्रशांत झाडे यांनी सुवर्ण पदक मिळविले,तर जोडी ब्रीज मध्ये विवेक मारोडे व अनुप पंडित यांनी सुवर्ण व ब्रजेश गुप्ती व प्रशांत झाडे यांनी रजत पदक मिळविले.

टेबल टेनिसमध्ये महिलांचा एकाधिकार – तीन सुवर्ण
टेबल टेनिसमध्ये अकोला- अमरावती परिमंडळाने याही वर्षी एकतर्फी वर्चस्व गाजवत तीन सुवर्ण पदके मिळविली.टेबल टेनिसच्या सांघिक खेळात स्नेहल बडे, मनिषा बुरांडे, कोमल पुरोहित, स्वाती जाधव यांनी सुवर्ण पदक घेतले, जोडीमध्ये स्नेहल बडे व कोमल पुरोहित यांनी सुवर्ण पटकावले असून राष्ट्रीय खेळाडू असलेल्या स्नेहल बडे यांनी एकेरी क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक घेत आपले वर्चस्व अबाधित ठेवले.
याचबरोबर शरीरसौष्ठव, कुस्ती, पॉवरलिफ्टिंग आणि ऍथलेटिक्समध्येही चमकदार कामगिरी बघायला मिळाली असून
शरीरसौष्ठव (९० किलोपेक्षा जास्त) : मोहम्मद मुजाहिद अनवर ,कुस्तीमध्ये (८६ किलो) हसनुद्दीन शेख आणि पॉवर लिफ्टींगमध्ये (६६ किलो) तेजस आबाळे यांनी सुवर्ण पदक पटकावले. पॉवर लिफ्टींगमध्ये प्रविण तायडे यांना रजत पदक मिळाले असून,६१ किलो वजनी गटात कुस्ती या खेळ प्रकारात दरवर्षी सुवर्ण पदकाचा मानकरी असलेल्या विनोद गायकवाड यांना रजत पदकावर समाधान मानावे लागले.याचबरोबर माधुरी मडाले यांनी ४०० आणि १५०० मिटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रत्येकी १ रजत पदक मिळवित आपले वर्चस्व अधेरेखित केले असून निलेश वैद्य यांना लांब उडीत रजत पदक मिळाले आहे.

