Mahabreaking

[breaking_news]

Thieves :बाभूळगावात चोरट्यांचा धुमाकूळ! घर फोडून सोन्याचे दागिने, रोख रकमेसह दुचाकी लंपास

Thieves : पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाभूळगाव येथे १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेत सोन्याची चेन, रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक दुचाकी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Thieves

शेतातील साहित्य चोरीनंतर आता चोरट्यांचा घरातही शिरकाव; बाभूळगावात तीन लाखांची चोरी

राहुल सोनोने

दिग्रस बु.: पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाभूळगाव येथे १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेत सोन्याची चेन, रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक दुचाकी असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाभूळगाव येथील संजय विश्वनाथ गायकवाड यांच्या राहत्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केली. चोरट्यांनी घरातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, २० हजार रुपये रोख तसेच अंदाजे ६५ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक दुचाकी चोरून नेली. या चोरीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, बाभूळगाव परिसरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी शेतातील मोटारपंप, केबल आणि इतर शेती उपयोगी साहित्य चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. मात्र, आता चोरट्यांनी थेट घरांनाच लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

चोरट्यांचे धाडस वाढत असताना पोलिसांकडून प्रभावी गस्त का घातली जात नाही, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. बाभूळगावसह परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, चोरीच्या घटनांचा तातडीने छडा लावून चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top