Mahabreaking

[breaking_news]

Exposed transformer : डोणगाव बसस्थानकाशेजारील उघडे रोहित्र ठरतेय जीवघेणे; महावितरणच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचा धोका!

Exposed transformer : स्थानिक बसस्थानकाशेजारील वर्दळीच्या राज्य महामार्गालगत असलेले उघडे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे. या रोहित्राचे सुरक्षा दरवाजे पूर्णपणे गायब झाले असून, परिसरात कोणतीही संरक्षक भिंत किंवा सुरक्षा जाळी नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरण प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Exposed

राज्य महामार्गालगत उघड्या रोहित्राचा धोका; शाळकरी मुले, नागरिक आणि वाहनचालकांचा जीव टांगणीला

डोणगाव : स्थानिक बसस्थानकाशेजारील वर्दळीच्या राज्य महामार्गालगत असलेले उघडे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे. या रोहित्राचे सुरक्षा दरवाजे पूर्णपणे गायब झाले असून, परिसरात कोणतीही संरक्षक भिंत किंवा सुरक्षा जाळी नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरण प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या मार्गावरून नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनचालकांची दिवसभर मोठी वर्दळ असते. विशेष म्हणजे, या रोहित्राच्या अगदी शेजारी रस्त्यालगत फळांचे दुकान असल्याने तेथे ग्राहकांचीही सतत गर्दी असते. अशा परिस्थितीत उघड्या रोहित्राच्या संपर्कात एखादी व्यक्ती नकळत आल्यास विजेचा धक्का लागून मोठी जीवितहानी होण्याची भीती स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पावसाळा असो वा उन्हाळा, या उघड्या रोहित्रामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या विद्युत रोहित्राच्या सुरक्षेकडे महावितरण प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा संतप्त आरोप केला जात आहे. संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित विभागाने वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी

एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येण्यापेक्षा संभाव्य धोका वेळीच दूर करणे गरजेचे आहे. त्यामुळे महावितरण विभागाने या रोहित्राची तातडीने पाहणी करून आवश्यकतेनुसार ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. तसेच रोहित्राला सुरक्षित दरवाजे बसवून त्याभोवती संरक्षक जाळी किंवा भिंत उभारावी, अशी मागणी डोणगाव येथील संतप्त नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top