Mahabreaking

[breaking_news]

Kalasharohan ceremony :गोहोगाव दांदडे येथे श्री विघ्नहर्ता गणपती मंदिराचा कलशारोहण सोहळा; १२ नोव्हेंबरला धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!

Kalasharohan ceremony : गोहोगाव दांदडे येथील वाणी गल्ली परिसरात श्री विघ्नहर्ता गणपती मंदिराचा कलशारोहण सोहळा गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या मंगलमय सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Kalasharohan

 श्री विघ्नहर्ता गणपती मंदिरावर चढणार भक्तीचा कळस! गोहोगाव दांदडे येथे कलशारोहण सोहळ्याचे आयोजन

डोणगाव  : गोहोगाव दांदडे येथील वाणी गल्ली परिसरात श्री विघ्नहर्ता गणपती मंदिराचा कलशारोहण सोहळा गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या मंगलमय सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कलशारोहण सोहळ्याची सुरुवात सकाळी ८ वाजता कलश मिरवणूक व कलशपूजनाने होणार आहे. ष.ब्र. १०८ सद्गुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज (श्रीमद् जगद्गुरू पलसिद्ध धर्मपीठ, साखरखेर्डा, जि. बुलढाणा) यांच्या शुभहस्ते कलशारोहण विधी पार पडणार आहे.

कलशारोहणानंतर मंदिरात महाआरती करण्यात येणार असून, त्यानंतर उपस्थित भाविक व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

श्री नवयुवक गणेश मंडळ, वाणी गल्ली, गोहोगाव दांदडे यांच्या वतीने परिसरातील सर्व भाविक भक्त आणि ग्रामस्थांनी या मंगलमय कलशारोहण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top