National Press Day: भारतीय प्रेसच्या स्वातंत्र्याचा आणि जबाबदारीचा सन्मान करण्यासाठी साजरा होणारा राष्ट्रीय पत्रकार दिन बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवन येथे रविवार,16 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. याप्रसंगी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांची घोषणा
बुलढाणा: भारतीय प्रेसच्या स्वातंत्र्याचा आणि जबाबदारीचा सन्मान करण्यासाठी साजरा होणारा राष्ट्रीय पत्रकार दिन बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवन येथे रविवार,16 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. याप्रसंगी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
प्रेस अर्थात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. माध्यमांच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. यानुसार, जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने बुलढाणा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी पत्रकारितेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, समाजाच्या अव्यक्त वेदना पत्रकारांच्या माध्यमातून व्यक्त होतात. बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारितेविषयी सांगायचे झाल्यास, आजवर अनेकांनी कितीतरी दशके समाजहित जोपासून लेखणी झिजवली आहे. आता, पत्रकारीतेत डिजीटल क्रांती झाली असल्याने अनेकविध बदल पहायला मिळतात. त्यामुळे, दिल्ली, मुंबई यासारख्या मोठ्या शहरातून होणाऱ्या माध्यमांच्या कामकाजाचा अभ्यास करून, आपणही नावीन्यपूर्ण धोरण स्वीकारू या, यासाठी जिल्हा पत्रकार संघातर्फे लवकरच एका अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी केली. याप्रसंगी पत्रकार सर्वश्री राजेंद्र काळे, सुभाष लहाणे, भानुदास लकडे, राजेश डीडोळकर, रवींद्र गणेशे, जितेंद्र कायस्थ, जाकीर शाह, गणेश सोळंकी, कासिम शेख, वसिम शेख, विनोद सावळे, रहेमत अली, अजय राजगुरे, विलास सोनोने, राम हिंगे, राजाभाऊ दवणे, अभिषेक वरपे, अजय काकडे, आकाश भालेराव, फरझान, तुषार यंगड यांसह अनेकांची उपस्थिती होती.

