Mahabreaking

[breaking_news]

Samruddhi Mahamarg :समृद्धी महामार्गावरील बुलढाण्याच्या सुरक्षेला ५४ पोलिसांचे बळ! दुसरबीड, सिंदखेडराजा मदत केंद्रांसाठी ५४ पदांना मंजुरी

Samruddhi Mahamarg : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसह अपघात नियंत्रण आणि आपत्कालीन मदत व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या महामार्गावरील १५ महामार्ग पोलीस मदत केंद्रे आणि एका नियंत्रण कक्षासाठी एकूण ४२० नियमित पदांची निर्मिती करण्यास गृह विभागाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड आणि सिंदखेडराजा या दोन महामार्ग पोलीस मदत केंद्रांसाठी प्रत्येकी २७, अशी एकूण ५४ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.

Samruddhi

  दुसरबीड अन् सिंदखेडराजा महामार्ग पोलीस मदत केंद्रांना मिळणार स्वतंत्र फौजफाटा; प्रत्येकी २७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त होणार

गजानन तिडके

बुलढाणा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसह अपघात नियंत्रण आणि आपत्कालीन मदत व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या महामार्गावरील १५ महामार्ग पोलीस मदत केंद्रे आणि एका नियंत्रण कक्षासाठी एकूण ४२० नियमित पदांची निर्मिती करण्यास गृह विभागाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड आणि सिंदखेडराजा या दोन महामार्ग पोलीस मदत केंद्रांसाठी प्रत्येकी २७, अशी एकूण ५४ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, या दोन्ही केंद्रांवर स्वतंत्र पोलीस अधिकारी, तपासणी व बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी तसेच वाहनचालकांचे मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत पोलीस यंत्रणेची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

दुसरबीड आणि सिंदखेडराजा केंद्रांवर २७-२७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवर दुसरबीड आणि सिंदखेडराजा या दोन्ही महामार्ग पोलीस मदत केंद्रांसाठी पदांचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रासाठी मंजूर करण्यात आलेल्या २७ पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • सहायक पोलीस निरीक्षक – १
  • पोलीस उपनिरीक्षक – २
  • सहायक पोलीस उपनिरीक्षक – ३
  • पोलीस शिपाई – १८
  • पोलीस शिपाई (वाहनचालक) – ३

अशा प्रकारे एका केंद्रावर एकूण २७ अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार असून, दोन्ही केंद्रांसाठी मिळून ५४ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

दोन्ही केंद्रांवर मिळणार स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी

या मनुष्यबळामध्ये प्रत्येक केंद्रासाठी एका सहायक पोलीस निरीक्षकाची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे केंद्राच्या कामकाजावर देखरेख आणि नेतृत्वाची जबाबदारी अधिकाऱ्याकडे राहणार आहे. दोन पोलीस उपनिरीक्षक आणि तीन सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यामुळे पोलीस कामकाजाचे नियोजन, महामार्गावरील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि आवश्यक पोलीस कार्यवाही करण्यासाठी अधिकारी उपलब्ध होतील.

तसेच १८ पोलीस शिपाई आणि तीन पोलीस शिपाई वाहनचालक यांचे स्वतंत्र मनुष्यबळ मिळणार आहे. महामार्गावरील गस्त, अपघातस्थळी तातडीने पोहोचणे, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य आणि प्रवाशांना आवश्यक पोलीस सहाय्य देण्यासाठी या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

१६ केंद्रांसाठी ४२० नियमित पदांची निर्मिती

समृद्धी महामार्गावरील एकूण १५ महामार्ग पोलीस मदत केंद्रे आणि एका नियंत्रण कक्षासाठी मंजूर झालेल्या ४२० पदांमध्ये १६ सहायक पोलीस निरीक्षक, ३२ पोलीस उपनिरीक्षक, ४८ सहायक पोलीस उपनिरीक्षक, २७६ पोलीस शिपाई आणि ४८ पोलीस शिपाई (वाहनचालक) यांचा समावेश आहे.

प्रत्येक नियमित महामार्ग पोलीस मदत केंद्रासाठी २७ पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर छत्रपती संभाजीनगर येथील महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षासाठी १५ पदांचे मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे.

४३ कोटींचा आवर्ती, तर साडेसात कोटींचा अनावर्ती खर्च

या ४२० नियमित पदांसाठी शासनाने ४३ कोटी ४७ लाख ३३ हजार ४२४ रुपयांच्या आवर्ती खर्चाला, तर सात कोटी ४५ लाख ८८ हजार ९६६ रुपयांच्या अनावर्ती खर्चाला मंजुरी दिली आहे. हा खर्च त्या-त्या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे.

सध्या समृद्धी महामार्गावरील पोलीस मदत केंद्रांच्या कामकाजासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (MSF) १९२ कर्मचारी कार्यरत आहेत. मंजूर करण्यात आलेल्या ४२० नियमित पदांची भरती पूर्ण झाल्यानंतर हे १९२ कर्मचारी संबंधित यंत्रणेकडे परत करण्यात येणार आहेत. रिक्त पदांची भरती आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) खर्चाची प्रतिपूर्ती मिळविण्यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील महामार्ग सुरक्षेला बळ

समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या, वेगवान वाहतूक, अपघातांची संभाव्य जोखीम आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्याची गरज लक्षात घेता दुसरबीड आणि सिंदखेडराजा येथील पोलीस मदत केंद्रांसाठी मंजूर झालेली ५४ पदे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

आतापर्यंत उपलब्ध मनुष्यबळावर अवलंबून असलेल्या या केंद्रांना आता स्वतंत्र नियमित अधिकारी आणि कर्मचारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या पदांची प्रत्यक्ष भरती, नियुक्ती आणि केंद्रांवरील कर्मचारी तैनाती कधी पूर्ण होते, यावर या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी अवलंबून राहणार आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत पोलीस मदत केंद्रांचे मनुष्यबळ वाढणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि महामार्गावरील आपत्कालीन मदत व्यवस्थेसाठी अधिक सक्षम यंत्रणा उभी राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top