Mahabreaking

[breaking_news]

Makarand Jadhav Patil :दुष्काळाचे संकट गडद होण्यापूर्वीच प्रशासनाने कामाला लागावे! पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांचे निर्देश

Makarand Jadhav Patil : जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसह विविध सवलती आणि योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत तत्परतेने पोहोचवावा. पशुधनासाठी चारा, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि उपलब्ध जलसाठ्याचे सिंचनासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.

Makarand

 शेतकऱ्यांवर सक्तीची वसुली नको; चारा-पाणी-वीज नियोजनासाठी प्रशासनाला पालकमंत्र्यांचा अलर्ट!

बुलढाणा : जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसह विविध सवलती आणि योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत तत्परतेने पोहोचवावा. पशुधनासाठी चारा, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि उपलब्ध जलसाठ्याचे सिंचनासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.

Makarand

जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि त्यावर मात करण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री आणि सहपालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, आमदार सिद्धार्थ खरात आणि आमदार मनोज कायंदे ऑनलाइन सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह जलसंपदा, कृषी, मृद व जलसंधारण, पशुसंवर्धन विभागांचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Makarand

१ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

बैठकीत जिल्ह्यातील कर्जमाफीच्या अंमलबजावणीचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. एकही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. विशेषतः दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिक गडद होऊ नये, यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची सक्तीची वसुली करू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

महसूल आणि कृषी विभागाने समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ सुलभतेने मिळवून द्यावा. शासनाने पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. प्रशासनाच्या तत्परतेमुळे ही आर्थिक मदत शेतकऱ्यांपर्यंत वेगाने पोहोचत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आगामी काळातही सर्व शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

चारा टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन

संभाव्य चारा टंचाईचे संकट निर्माण होण्यापूर्वीच पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना चारा लागवड आणि चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध राहील, याची आतापासूनच खबरदारी घ्यावी. तसेच वनक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटना टाळण्यासाठी वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जलसंधारणाच्या कामांना द्यावे प्राधान्य

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंधारण आणि उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन यांना प्राधान्य देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. पाणी आरक्षणाबाबत शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करून सिंचनासाठी उपलब्ध पाण्याची स्थिती तपासावी. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध आणि न्याय्य वितरण होण्यासाठी जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नद्यांचे खोलीकरण, तलावांमधील गाळ काढणे, नाले खोलीकरण, शेततळ्यांची निर्मिती आणि माथा ते पायथा जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. या कामांचे सूक्ष्म नियोजन करून ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

दिवाळीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश

दिवाळी सणाच्या कालावधीत नागरिक आणि शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याबाबत कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने विशेष दक्षता घ्यावी. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच संभाव्य पाणीटंचाई, पशुधनासाठी चारा उपलब्धता, जलसंधारणाची कामे आणि सिंचनासाठी पाण्याचे नियोजन या सर्व बाबींचा वेळेत आढावा घ्यावा. आगामी दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top