Mahabreaking

[breaking_news]

Bhadant B. Sanghapal Mahathero :व्यसनमुक्त भावी पिढीसाठी मुलांवर संस्कार रुजवा! भदंत बी. संघपाल महाथेरो यांचे पालकांना आवाहन

Bhadant B. Sanghapal Mahathero : येथून जवळच असलेल्या उगवा येथील भीमज्योती बुद्ध विहार, अशोकनगर, राखी उपराटे आणि राहुलनगर आदी ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यामध्ये वाचक म्हणून विजीत शिरसाट, जीवन भातकुले आणि अण्णा तायडे यांनी आपल्या मधुर वाणीतून ग्रंथवाचन केले. या धार्मिक उपक्रमात धम्म उपासक आणि उपासिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Bhadant

 ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथवाचनातून धम्मविचारांचा प्रसार; उगवा येथे वर्षावास समारोप सोहळा उत्साहात

आगर : येथून जवळच असलेल्या उगवा येथील भीमज्योती बुद्ध विहार, अशोकनगर, राखी उपराटे आणि राहुलनगर आदी ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यामध्ये वाचक म्हणून विजीत शिरसाट, जीवन भातकुले आणि अण्णा तायडे यांनी आपल्या मधुर वाणीतून ग्रंथवाचन केले. या धार्मिक उपक्रमात धम्म उपासक आणि उपासिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यातील भीमज्योती बुद्ध विहार आणि अशोकनगर येथे वर्षावास उत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १ नोव्हेंबर रोजी बुद्ध विहार येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला भिक्खू-भिक्खुनींची उपस्थिती होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देण्डवे, भारतीय बौद्ध महासभा अकोला तालुका पश्चिमचे माजी अध्यक्ष शेषराव शिरसाट, मोहन तायडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तर २ नोव्हेंबर रोजी अशोकनगर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत बी. संघपाल महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षावास उत्सवाचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार प्रमुख डी. एस. ननिर, अकोला तालुका पश्चिमचे माजी अध्यक्ष शेषराव शिरसाट, केंद्रीय शिक्षक सरोज डोंगरे, माजी जिल्हा सचिव भीमराव खंडारे, बी. डी. वानखडे, सुधाकर सरदार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, अकोला तालुकाध्यक्षा मंगला शिरसाट, बाळापूर पंचायत समितीचे माजी सभापती निरंजन शिरसाट यांच्यासह अकोला, बाळापूर आणि पातूर तालुक्यांतील भारतीय बौद्ध महासभेचे आजी-माजी पदाधिकारी तसेच धम्म उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक सुत्तपठण घेण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय शिक्षिका सरोज डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा संस्कार प्रमुखांनी आपल्या मनोगतातून प्रत्येक मानवाने धम्माची शिकवण आचरणात आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना भदंत बी. संघपाल महाथेरो यांनी भावी पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार घडविण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुलांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी आई-वडिलांनी त्यांना लहानपणापासूनच चांगल्या विचारांची आणि नैतिक मूल्यांची शिकवण द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन जीवन भातकुले यांनी केले. धम्मग्रंथातील प्रतिज्ञांचे वाचन करून ग्रंथवाचनाचा समारोप करण्यात आला. यावेळी सुनील उपराटे यांच्या परिवाराच्या वतीने भदंत बी. संघपाल महाथेरो यांना चिवरदान करण्यात आले. आगर येथील विशाखा उपासिका संघानेही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.

रमाबाई उपासिका संघ, धम्म उपासक आणि तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सरणत्तय ग्रहण करून वर्षावास उत्सवाची सांगता करण्यात आली.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top