Mahabreaking

[breaking_news]

Ramdas Rajegaonkar : राजेगावच्या सुपुत्राच्या साहित्यिक प्रतिभेचा राष्ट्रीय गौरव! रामदास राजेगावकर यांच्या ‘विकासाचा चक्रव्यूह’ला राष्ट्रीय पुरस्कार

Ramdas Rajegaonkar : सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील मूळ रहिवासी आणि सध्या मेहकर येथे स्थायिक असलेले ज्येष्ठ साहित्यिक रामदास राजेगावकर यांच्या साहित्यिक योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. त्यांच्या पर्यावरणविषयक वैचारिक लेखसंग्रह ‘विकासाचा चक्रव्यूह’ या ग्रंथाची प्रतिष्ठेच्या ‘संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक साहित्य पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. समृद्धी प्रकाशन, हिंगोली यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, पुढील महिन्यात पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती पुरस्कार संयोजन समितीचे प्रा. डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी दिली.

Ramdas

  पर्यावरणविषयक वैचारिक लेखनाची राष्ट्रीय स्तरावर दखल; रामदास राजेगावकर यांना ‘संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील मूळ रहिवासी आणि सध्या मेहकर येथे स्थायिक असलेले ज्येष्ठ साहित्यिक रामदास राजेगावकर यांच्या साहित्यिक योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. त्यांच्या पर्यावरणविषयक वैचारिक लेखसंग्रह ‘विकासाचा चक्रव्यूह’ या ग्रंथाची प्रतिष्ठेच्या ‘संत नामदेव राष्ट्रीय वैचारिक साहित्य पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. समृद्धी प्रकाशन, हिंगोली यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, पुढील महिन्यात पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती पुरस्कार संयोजन समितीचे प्रा. डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी दिली.

पर्यावरण आणि विकास यांच्यातील परस्परसंबंध, विकासाच्या संकल्पनेतील विरोधाभास, निसर्गापुढील आव्हाने आणि पर्यावरण संवर्धनाची आवश्यकता अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर ‘विकासाचा चक्रव्यूह’ या ग्रंथातून राजेगावकर यांनी चिकित्सक व वैचारिक मांडणी केली आहे. विकासाच्या नावाखाली निसर्ग आणि पर्यावरणावर होणारे परिणाम अधोरेखित करत समाजाला विचार करायला लावणारा हा लेखसंग्रह ठरला आहे. त्यामुळे या ग्रंथाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी झालेली निवड ही त्यांच्या साहित्यिक गुणवत्तेची पावती मानली जात आहे.

यापूर्वीही राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव

रामदास राजेगावकर यांच्या ‘विकासाचा चक्रव्यूह’ या ग्रंथाला यापूर्वी स्वदेशी भारत, फलटण आणि यशदा, पुणे यांच्याकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या साहित्यिक प्रवासात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

रामदास राजेगावकर हे ‘साहित्य जगत’ या मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत असून मेहकर तालुक्यातील साहित्य चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. विविध साहित्य संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत. तसेच राज्यस्तरीय तिसऱ्या ‘साहित्य जगत’ मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. वैचारिक लेखन, साहित्य संपादन आणि साहित्य चळवळीतील सक्रिय योगदानातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

राजेगाव ते राष्ट्रीय साहित्य क्षेत्रापर्यंत भरारी!

सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव या गावाशी मूळ नाळ जोडलेल्या रामदास राजेगावकर यांच्या ग्रंथाला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाल्याने राजेगाव, मेहकर आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या साहित्यिकाच्या वैचारिक लेखनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे ही जिल्ह्याच्या साहित्यिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या निवडीबद्दल प्रा. भगवान राईतकर मित्र मंडळ, ‘अभिव्यक्ती सामर्थ्य’ परिवार, कविश्रेष्ठ ना. घ. देशपांडे साहित्य मंच यांच्यासह विविध साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांनी रामदास राजेगावकर यांचे अभिनंदन केले असून पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top