Mahabreaking

🔴 BREAKING
Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’ Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’

District Collector Dr. Kiran Patil ‘on field :जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील ‘ऑन फील्ड’ : अवैध बायोडिझेलवर मोठी धडक कारवाई; २३ हजार किलो बायोडिझेल केले जप्त

District Collector Dr. Kiran Patil ‘on field :जिल्ह्यातील अवैध बायोडिझेल व्यवहारावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आज (दि.१५) मोठी कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर–मलकापूर रोडवर संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या टॅंकरवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत तब्बल २९,०३० किलो अवैध बायोडिझेल जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १२ लाख ३३ हजार १९४ रुपये इतकी आहे. संबंधित टॅंकर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

District Collector

बुलढाणा : जिल्ह्यातील अवैध बायोडिझेल व्यवहारावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आज (दि.१५) मोठी कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर–मलकापूर रोडवर संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या टॅंकरवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत तब्बल २९,०३० किलो अवैध बायोडिझेल जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १२ लाख ३३ हजार १९४ रुपये इतकी आहे. संबंधित टॅंकर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

उपलब्ध माहितीनुसार, टॅंकर क्रमांक GJ03BW3034 हा वडनेर–मलकापूर रोडवर संशयितरीत्या उभा असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. तपासादरम्यान चालक सहदेवने उडवाऊडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला आणि पथकाने तत्काळ छापा टाकला. चौकशीत हा बेकायदेशीर बायोडिझेल हॉनेस्ट कॉर्पोरेशन, पणोली (अंकलेश्वर, जिल्हा भरूच, गुजरात) येथून बापा सीताराम ट्रेडिंग, वाघुड (ता. मलकापूर, जि. बुलढाणा) येथे पाठविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

या प्रकरणात संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही तहसीलदार राहुल तायडे व पुरवठा निरीक्षक धनश्री हरणे यांनी केली असून गुन्हा नोंदविणे सुरू आहे. अवैध बायोडिझेल विक्री, वाहतूक आणि साठा प्रकरणी पुढील तपास जिल्हा प्रशासन आणि पोलीस निरीक्षक गणेश गिरी करत आहेत.

“जिल्ह्यात बेकायदेशीर बायोडिझेल व्यवहार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. यात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती प्रशासनाला कळवावी,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top