Mahabreaking

[breaking_news]

Shri Venkatesh College: श्री व्यंकटेश महाविद्यालयाची दिल्ली भरारी! अर्जुन वाघमारेची राज्यस्तरीय ११ सदस्यीय चमूमध्ये निवड

Shri Venkatesh College: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील बी.एस्सी. तृतीय वर्षाचा विद्यार्थी आणि ‘करिअर संसद मुख्यमंत्री’ अर्जुन वाघमारे याची ‘नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र’ या विशेष उपक्रमासाठी राज्यस्तरीय ११ सदस्यीय चमूमध्ये निवड झाली आहे. या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि विद्यार्थी विकासाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Shri Venkatesh

  ‘नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र’; देऊळगाव राजाच्या अर्जुन वाघमारेला दिल्ली दौऱ्याची संधी

गजानन तिडके

देऊळगाव राजा  : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील बी.एस्सी. तृतीय वर्षाचा विद्यार्थी आणि ‘करिअर संसद मुख्यमंत्री’ अर्जुन वाघमारे याची ‘नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र’ या विशेष उपक्रमासाठी राज्यस्तरीय ११ सदस्यीय चमूमध्ये निवड झाली आहे. या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि विद्यार्थी विकासाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, प्रशासकीय जाणीव, विश्लेषणक्षमता आणि राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

राज्यस्तरीय सादरीकरणातून निवड

या उपक्रमासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांची प्रथम विभागीय स्तरावर सादरीकरणाच्या माध्यमातून निवड करण्यात आली. त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय सादरीकरणातून अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रभावी सादरीकरण, नेतृत्वक्षमता, ‘करिअर कट्टा’ उपक्रमातील सहभाग, विश्लेषणात्मक दृष्टिकोन आणि दिल्ली दौऱ्यासाठीची तयारी या निकषांचा विचार करून राज्यस्तरीय ११ सदस्यीय चमूची निवड करण्यात आली. या प्रतिष्ठित चमूमध्ये अर्जुन वाघमारे याने स्थान मिळविले आहे.

दिल्ली दौऱ्यात प्रशासकीय कामकाजाचा अभ्यास

या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. याद्वारे प्रशासनाची कार्यपद्धती, निर्णयप्रक्रिया, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि देशाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेता येणार आहे. या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळण्यासोबतच त्यांच्यात राष्ट्रीय दृष्टिकोन आणि प्रशासकीय कार्याविषयीची समज विकसित होण्यास मदत होणार आहे.

महाविद्यालयाकडून अभिनंदन

अर्जुन वाघमारे याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री बालाजी संस्थान, देऊळगाव राजा येथील वंशपरंपरागत विश्वस्त तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. छायाराजे विजयसिंह जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.

तसेच ‘करिअर कट्टा’चे समन्वयक प्रा. डॉ. ज्ञानेश्वर शिंब्रे यांचेही अभिनंदन करण्यात आले. अर्जुन वाघमारे याच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top